आरसीबीविरुध्द पुण्याचे पारडे जड

By admin | Published: April 29, 2017 12:42 AM2017-04-29T00:42:27+5:302017-04-29T00:42:27+5:30

कोलकात्याकडून लाजिरवाण्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्सच्या आव्हानाला जबरदस्त धक्का बसला आहे. याचा फायदा रायझिंग पुणे सुपरजायंट संघाला मिळाला

Ranee against Pune | आरसीबीविरुध्द पुण्याचे पारडे जड

आरसीबीविरुध्द पुण्याचे पारडे जड

Next

सुनील गावसकर लिहितात...

कोलकात्याकडून लाजिरवाण्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्सच्या आव्हानाला जबरदस्त धक्का बसला आहे. याचा फायदा रायझिंग पुणे सुपरजायंट संघाला मिळाला असून त्यांना गुणतालिकेतआघाडी घेण्याची संधी आहे. आरसीबीकडे मजबूत फलंदाजी आहे. मात्र, खेळपट्टीचा फायदा गोलंदाजांना अधिक होत असल्याने त्यांचे फलंदाज अपयशी ठरत आहेत. सलग दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर त्यांची ही कमकुवत बाजू प्रतिस्पर्धी संघांच्या लक्षात आली. ज्यावेळी चेंडू योग्य पद्धतीने वळायचा त्यावेळी त्यांची फलंदाजी ढेपाळत होती. आता उर्वरित सामन्यांत आरसीबी विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ तशाच प्रकारची खेळपट्टी तयार करण्याचा प्रयत्न करतील. जेथे चेंडू उसळेल किंवा स्वीम मूव्हमेंट मिळेल. आरसीबीची ‘लाईन अप’ मोडून काढण्यासाठी हाच प्रयत्न केला जाईल. परंतु, क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी ही कल्पना योग्य ठरेल असे नाही.
कोलकात्याविरुद्ध पुणे संघ अशीच तयारी करेल. मात्र, त्यांचा आत्मविश्वास आणि फॉर्म पाहता कोलकाता नाईट रायडर्सला रोखणे कठीण आहे. काही वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने उथप्पा फलंदाजी करायचा त्याच फॉर्ममध्ये तो परतलाय. जेव्हा तो टिच्चून फटके मारतो तेव्हा प्रतिस्पर्ध्यांसाठी महागडा ठरतो. संघासाठी ज्या पद्धतीचे योगदान गरजेचे आहे ते देण्याचे काम कर्णधार गौतम गंभीर करीत आहे. गेल्या सामन्यात धक्कादायक पराभवानंतर मुंबई इंडियन्सही विजयाचा मार्ग शोधत आहे. फलंदाजी क्रमात बदल करून कर्ण शर्माला आघाडीवर आणण्याचा ते प्रयत्न करतील. कोलकाता संघाने ज्या पद्धतीने नरेनला सलामीला आणले त्याच पद्धतीने मुंबईसुद्धा प्रयोग करेल. रॉयल चॅलेंजर्सवर सहज विजय मिळवणारा गुजरात संघही लयीत आहे. ब्रॅण्डन मॅक्क्युलम ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्यावरून त्यांनाही रोखणे कठीण आहे. अ‍ॅरोन फिंच आणि सुरेश रैना हे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. नाथू सिंग हा गोलंदाजी विभाग सांभाळून आहे. बासील थम्पी संघाला सुरुवातीचे झटके देण्यास मदत करीत आहे. (पीएमजी)
महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी मार्गावर येण्याचा प्रयत्न करतील. मात्र, मुंबईच्या तुलनेत पुणे संघासाठी हा शनिवार अधिक सोपा दिसत आहे. 

Web Title: Ranee against Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.