रणजी फायनल - गुजरातचा मुंबईवर व्हायब्रंट विजय
By admin | Published: January 14, 2017 03:36 PM2017-01-14T15:36:12+5:302017-01-14T15:47:17+5:30
पार्थिव पटेलने केलेल्या कर्णधार खेळीच्या आधारावर गुजरातने मुंबईचा पराभव करत प्रथमच रणजी करंडक जिंकला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
इंदूर, दि. 14 - पार्थिव पटेलने केलेल्या कर्णधार खेळीच्या आधारावर गुजरातने मुंबईचा पराभव करत 83 वर्षांनी प्रथमच रणजी करंडक जिंकला आहे. रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईने गुजरातसमोर 312 धावाचं आव्हान ठेवलं होतं. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा लक्ष्याचा पाठलाग करणा-या गुजरातने 47 धावांवर बिनवाद अशी सुरुवात केली होती. त्यानंतर गुजरातने लगेचच आपले तीन विकेट्स गमावले होते. मात्र पार्थिव पटेलने एका बाजूने भक्कम खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. पार्थिव पटेल 143 धावांवर झेलबाद झाला. गुजरातने 5 विकेट्स राखत मुंबईचा पराभव केला.
मुंबईने गुजरातसमोर ठेवलेलं 312 धावाचं लक्ष्य पुर्ण करत एक नवा रेकॉर्ड केला आहे. इतकी मोठी धावसंख्या आतापर्यत तीन वेळाच पार करण्यात प्रतिस्पर्धी संघ यशस्वी ठरला होता. मुंबईने आतापर्यंत 40 वेळा रणजी जिंकला असून शिरपेचात अजून एक तुरा रोवण्याची संधी त्यांच्याकडे होती. मात्र पार्थिव पटेलच्या खेळीपुढे मुंबईचे गोलंदाज निष्प्रभ ठरले.
दुसऱ्या डावात बहरलेल्या फलंदाजीच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ४११ धावांची मजल मारून गुजरातला विजयासाठी ३१२ धावांचे कठीण आव्हान दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर गुजरातने बिनबाद ४७ अशी सुरुवात केली होती. अटीतटीच्या या सामन्यात रेकॉर्ड पाहता मुंबई बाजी मारेल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र गुजरातने रणजी करंडक आपल्या नावावर करत इतिहासात नोंद केली आहे.
गतविजेते संघ -
२०१५-१६ - कर्नाटक
२०१३-१४ - कर्नाटक
२०१२-१३ - मुंबई
२०११-१२ - राजस्थान
रणजी करंडक सांघिक विक्रम
- सर्वात जास्त विजय - ४० (मुंबई)
- सर्वात जास्त धावा - ९४४/६ (घोषित) - हैद्राबाद वि. आंध्र - १९९३-९४
- सर्वात कमी धावा - २१/१० - हैद्राबाद वि. राजस्थान - २०१०
खेळाडूंचे विक्रम
- सर्वात जास्त धावा - ४४३ नाबाद - बी.बी.निंबाळकर - महाराष्ट्र वि. काठेवाड (सौराष्ट्र) - १९४८-४९
- सर्वात चांगली गोलंदाजी (डाव) - १०/२० - प्रेमांशू चटर्जी - बंगाल वि. आसाम - १९५६-५७
- सर्वात चांगली गोलंदाजी (सामना) - १६/९९ - अनिल कुंबळे- कर्नाटक वि. केरळ - १९९४-९५