रणजी लढतीआधी ओझा-दिंडा आपसात भिडले
By admin | Published: November 14, 2016 01:49 AM2016-11-14T01:49:33+5:302016-11-14T01:49:33+5:30
तमिळनाडूविरुद्ध रविवारपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक लढतीआधी बंगाल संघावर मानहानीचा प्रसंग आला जेव्हा
राजकोट : तमिळनाडूविरुद्ध रविवारपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक लढतीआधी बंगाल संघावर मानहानीचा प्रसंग आला जेव्हा की त्यांचे दोन खेळाडू फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा आणि वेगवान गोलंदाज अशोक दिंडा हे सरावादरम्यान आपसात भिडले.
सूत्रांनुसार हा प्रसंग हे दोन खेळाडू फुटबॉल खेळण्यादरम्यान घडला. यादरम्यान दोघांदरम्यान वादावादी होत असताना दिसले. तथापि, या दोघांनी नंतर आपसातील वादाला पूर्णविराम दिला. उल्लेखनीय बाब म्हणजे बंगालचा प्रमुख गोलंदाज दिंडा नेहमीच आपल्या सहकाऱ्यांशी वाद घालत राहिला आहे. याआधी २00८ मध्ये मध्यप्रदेशविरुद्ध सामन्यादरम्यान त्याने त्याचा सहकारी एस. एस. पॉलसोबत आणि २00९ मध्ये विजय हजारे करंडकादरम्यान कर्णधार लक्ष्मीरतन शुक्लासोबत वाद झाला होता. हे प्रकरण बंगाल क्रिकेट संघटनेचे (कॅब) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासमोर गेले. गांगुलींनी दोन्ही खेळाडूंना कठोर शब्दांत शांत राहण्यास सांगितले आणि पूर्ण लक्ष पुढील लढतीवर केंद्रित करण्यास बजावले होते.(वृत्तसंस्था)