रणजी : मुंबईची निराशाजनक सुरुवात

By admin | Published: October 21, 2016 10:39 PM2016-10-21T22:39:36+5:302016-10-21T22:39:36+5:30

रजत पाटीदारच्या शानदार शतकी खेळाच्या जोरावर रणजी चषकाच्या गु्रप ‘ए’मध्ये मध्य प्रदेश संघाने सर्वबाद ४४५ धावांचा डोंगर उभारला.

Ranji: Mumbai's disappointing start | रणजी : मुंबईची निराशाजनक सुरुवात

रणजी : मुंबईची निराशाजनक सुरुवात

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ : रजत पाटीदारच्या शानदार शतकी खेळाच्या जोरावर रणजी चषकाच्या गु्रप ‘ए’मध्ये मध्य प्रदेश संघाने सर्वबाद ४४५ धावांचा डोंगर उभारला. तर प्रत्युत्तरात मुंबई संघाची सुरुवात निराशाजनक झाली असून दुसऱ्या दिवस अखेर मुंबई संघाने २ गडी गमावत ३२ धावा केल्या आहेत.
मध्य प्रदेश संघाने २ बाद २३९ धावांवरुन खेळण्यास सुरुवात केली. रजतने कर्णधार देवेंद्र बुंदेलाच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. रजतने चौफेर फटकेबाजी करत २४६ चेंडूत १५ चौकारांसह १०६ धावांची खेळी केली. नवव्या प्रथम श्रेणी सामन्यात रजतने चौथे शतक झळकावले. मोठी खेळी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या रजतला बलविंदर संधूने आदित्य तरेच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. रजत बाद झाल्यावर शुभम शर्मा (नाबाद ८३) आणि अंकित दाने (४७) ने सहाव्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. मध्य प्रदेशचे तळाचे पाच फलंदाज अवघ्या ४२ धावांत गुंडाळण्यात मुंबईच्या गोलंदाजांना यश आले. मुंबईच्या तुषार देशपांडे आणि विजय गोहिलने प्रत्येकी तीन गडी तंबूत धाडले. तर बलविंदर संधूने दोन गडी मिळवले.
प्रत्युत्तरात मुंबईचा सलामीवीर कौस्तुभ पवार ६ धावांवर बाद झाला. तर बलविंदर संधू १ धाव करत तंबूत परतला. दिवसअखेर मुंबई संघाने २ बाद ३२ धावांवर केल्या असून अखिल हेरवाडकर (२९) आणि श्रेयस अय्यर (१) खेळत आहे. मुंबई संघ ४०७ धावांवर पिछाडीवर असून आठ फलंदाज शिल्लक आहेत

Web Title: Ranji: Mumbai's disappointing start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.