रणजी ‘रन’संग्राम' , ४१व्यांदा चषकावर नाव कोरण्यास मुंबई सज्ज
By admin | Published: February 24, 2016 06:39 PM2016-02-24T18:39:52+5:302016-02-24T18:40:30+5:30
रणजी स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबईने रणजी सामन्यात्या पहिल्याच दिवशी सौराष्ट्रावर आघाडी मिळवत ४१ व्या रणजी चषकावर नाव
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २४ - रणजी स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबईने रणजी सामन्याच्या अंतिम सामन्यातील पहिल्याच दिवशी सौराष्ट्रावर आघाडी मिळवत ४१ व्या रणची चषकावर नाव कोरण्याची तयारी केली आहे. मुंबईने नानेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजानी अचूक ठरवला.
पहिल्याच दिवशी मुंबईच्या गोलंदाजानी सौराष्ट्रावर मात केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ८४.४ षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १९२ धावा सौराष्ट्राने बनवल्या आहेत.
सौराष्ट्राकडून सर्वाधिक अर्पित वासवदा याने ७७ धावांचे योगदान दिले. कर्णधार जयदेव शहा १३, अवि बारोत १४, अनुभवी चेतेश्वर पुजारा ४, चिराग जानी १३ धावांचे योगदान दिले आहे. प्रेरक मनजाद धावावर खेळत आहे. उद्या सकाळच्या सत्रात झटपट २ फलंदाज बाद करुन मुंबईचे फलंदाजीला येतील. मुंबईला आघाडी घेण्याची चांगली संधी आली आहे. मुंबईकडून कुलकर्णीने ४ फलंदाजानां तंबूचा रस्ता दाखवला. ठाकूरने २, नायर आणि साधूने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
दोन्ही संघात विजेतेपदासाठी पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर लढत सुरु आहे. हा ‘रन’संग्राम कोण जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईचा संघ ४५ व्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. मुंबईने ४० वेळा रणजी चषक पटकावला आहे. सौराष्ट्राचा संघ दुसऱ्यांचा अंतिम फेरीत स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला आहे.
हे दोन्ही संघ २०१२-१३ मध्ये अंतिम फेरीत समोरासमोर आले होते. त्यात मुंबईने सौराष्ट्रला एक डाव व १२५ धावांनी पराभूत करीत ४० वा किताब नावावर केला होता.
रणजीच्या ८२ वर्षांच्या इतिहासात मुंबईने ४० वेळा किताब नावावर केला आहे. चार वेळा ते उपविजेते राहिले आहेत. मुंबई १९९१ नंतर खेळलेल्या दहा अंतिम सामन्यांत एकदाही हरलेली नाही. मुंबईची मदार ही फलंदाजांवर असेल. श्रेयस
प्रतिस्पर्धी संघ -
मुंबई : आदित्य तारे (कर्णधार-यष्टीरक्षक), सुर्यकुमार यादव, अभिषेक नायर, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, निखिल पाटील, शार्दुल ठाकुर, सिद्धेश लाड, धवल कुलकर्णी, विशाल दाभोलकर, इक्बाल अब्दुल्ला, बद्रे आलम, भाविन ठक्कर, सुफियान शेख, बलविंदर सिंग संधु.
सौराष्ट्र : जयदेव शहा (कर्णधार), शेल्डन जॅक्सन, अवि बारोत, चेतेश्वर पुजारा, चिराग जानी, जयदेव उनादकट, प्रेरक मनजाद, कमलेश मकवाना, धर्मेंद्रसिंह जडेजा, वंदित जीवराजानी, अर्पित वासवदा, दिपक पुनिया, हार्दिक राठोड, मोहसिन दोडिया, सागर जोगियानी (यष्टीरक्षक).