रंजित महेश्वरीला तिहेरी उडीत रौप्य

By admin | Published: February 22, 2016 03:51 AM2016-02-22T03:51:51+5:302016-02-22T03:51:51+5:30

पॅन्टॅथलॉन खेळाडू स्वप्ना बर्मन हिला इराणी संघाकडून विरोध (प्रेटेस) दर्शविला गेल्यामुळे बाद करण्यात आल्याने आशियाई इनडोअर अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय

Ranjit Maheshwari's triple jump silver | रंजित महेश्वरीला तिहेरी उडीत रौप्य

रंजित महेश्वरीला तिहेरी उडीत रौप्य

Next

दोहा : पॅन्टॅथलॉन खेळाडू स्वप्ना बर्मन हिला इराणी संघाकडून विरोध (प्रेटेस) दर्शविला गेल्यामुळे बाद करण्यात आल्याने आशियाई इनडोअर अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला धक्का बसला.
दुसरीकडे रंजित महेश्वरीने तिहेरी उडीत रौप्य पदक जिंकून आपल्या संघाला दिलासा दिला. भारताची पदकांची संख्या आता एकूण पाच झाली आहे.
रंजितने रविवारी आज तिहेरी उडीत १६-१६ मीटरचे अंत कापून रौप्य आपल्या नावावर केले. कजाकिस्तानच्या रोमन वालियेव्हने १६.६९ मीटर उडी मारून
सुवर्ण पदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. कतारच्या राशिद अहमद अल मनाईला (१५.९७ मी.) कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या ६० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या गायत्री गोविंदराजने ८.३८ सेकंदांची वेळ नोंदवून व्यक्तिगत सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले. गायत्री सोमवारी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पात्र झाली आहे.(वृत्तसंस्था)

Web Title: Ranjit Maheshwari's triple jump silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.