रश्मीचा उपांत्य फेरीत दणक्यात प्रवेश

By admin | Published: January 29, 2016 03:26 AM2016-01-29T03:26:42+5:302016-01-29T03:26:42+5:30

महाराष्ट्राच्या रश्मी तेलतुम्बडे हिने एआयटीए मानांकन राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत धक्कादायक निकाल नोंदवताना तामिळनाडूच्या तिसऱ्या मानांकीत साई समिथा सी हिला

Rashmi reached the semi-finals | रश्मीचा उपांत्य फेरीत दणक्यात प्रवेश

रश्मीचा उपांत्य फेरीत दणक्यात प्रवेश

Next

मुंबई : महाराष्ट्राच्या रश्मी तेलतुम्बडे हिने एआयटीए मानांकन राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत धक्कादायक निकाल नोंदवताना तामिळनाडूच्या तिसऱ्या मानांकीत साई समिथा सी हिला पराभूत केले. यासह रश्मीने दिमाखात उपांत्य फेरी गाठली आहे.
जुहू येथील जेव्हीपीजी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या महिला गटातील उपांत्यपुर्व फेरीचा सामना चांगलाच गाजला. सातव्या मानांकीत रश्मीने पहिल्याच सेटमध्ये ६-३ अशी बाजी मारताना आश्चर्यकारक आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये मात्र साई समिथाने तुफान आक्रमक खेळ करताना ६-१ अशा दणदणीत विजयासह सामन्यात बरोबरी साधली. यावेळी साई समिथा बाजी मारणार अशी शक्यता होती. मात्र रश्मीने तोडिस तोड खेळ करताना अखेरचा सेट टायब्रेकमध्ये जिंंकताना साई समिथाचा ६-३, १-६, ७-६(९) असा झुंजार पराभव केला. अन्य एका लढतीत गोव्याच्या अग्रमानांकीत नताशा पल्हा हिने अपेक्षेनुसार उपांत्य फेरी गाठताना तामिळनाडूच्या बाबुराज नित्यराजचा ६-३, ६-३ असा धुव्वा उडवला. कर्नाटकच्या द्वितीय मानांकीत शर्मदा बालू हिनेही सहज उपांत्य फेरीत प्रवेश करताना दिल्लीच्या श्वेता राणाचा ६-२, ६-१ असा फडशा पाडला. तर पुण्याच्या नंदीनी शर्माने देखील झुंजार खेळासह उपांत्य फेरी गाठताना चौथ्या मानांकीत अमृता मुखर्जीला (पश्चिम बंगाल) ४-६, ६-४, ६-२ असा धक्का देत सर्वांचे लक्ष वेधले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Rashmi reached the semi-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.