रितीका, आकांक्षाचे विक्रमासह सुवर्ण

By Admin | Published: February 3, 2015 01:15 AM2015-02-03T01:15:42+5:302015-02-03T01:15:42+5:30

जलतरण, डाईव्हिंग, कुस्ती आणि नेमबाजी प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करून ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली.

Ratka, gold with a record of aspiration | रितीका, आकांक्षाचे विक्रमासह सुवर्ण

रितीका, आकांक्षाचे विक्रमासह सुवर्ण

googlenewsNext

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : जलतरणमध्ये महिलांच्या मिडले रिलेत नवीन उच्चांक
तिरुअनंतपुरम : महाराष्ट्रच्या पथकावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानासुद्धा संघातील खेळाडूंनी आपली मानसिकता ढळू न देता जलतरण, डाईव्हिंग, कुस्ती आणि नेमबाजी प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करून ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली.
*जलतरणमध्ये आजसुद्धा महाराष्ट्राच्या महिलांनी निर्विवाद वर्चस्व राखले. महिलांच्या ८०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात ९:१५.३० अशी विक्रमी वेळ नोंदवित सुवर्णपदक जिंकले. तिने २०११च्या ऋचा मिश्राचा ९:२४.४५ वेळेचा विक्रम मोडीत काढला. या प्रकारात मोनिका गांधीला ९:२९.२३ वेळेसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)

दररोज चार ते पाच तास कसून सराव, शारिरीक क्षमता टिकविण्यासाठी घेतलेली मेहनत या मुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णवेध शक्य झाला. कामगिरीत सातत्य राखताना कोठे कमी पडते याचा अभ्यास केला. त्याप्रमाणे चुका टाळण्यावर भर दिला. सरावत तशी प्रगती दिसत असल्याने सुवर्ण पदक मिळणे अपेक्षितच होते.
- पूजा घाटकर, आंतरराष्ट्रीय नेमबाज

च्महिलांच्या डाईव्हिंग प्रकारात महाराष्ट्राच्या रितीका श्रीरामने नवा राष्ट्रीय विक्रम करताना २३० गुणांची नोंद करून सुवर्णपदक तर दीप्ती पन्वरने २२१ गुणांसह रौप्यपदक जिंकले.

च्महिलांच्या नेमबाजीत १० मीटर रायफल प्रकारात महाराष्ट्राची पूजा घाटकरने वैयक्तिक गटात २०८.१ गुण संपादन करून सुवर्णपदक जिंकले. तिने सांघिक गटातसुद्धा अंजली भागवत, अयोनिका पॉल यांच्यासह अचूक नेम साधून सुवर्णपदकाचा डबल धमाका
केला.

महा खो-खो : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची आगेकूच
च्श्रीपादम स्टेडियम येथे सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरूष व महिला संघानी गटातील आपले सामने डावाच्या फरकाने जिंकून विजयी घौडदौड सुरू ठेवली, पुरूष संघाने पुड्डूचेरीचा, तर महिलांनी आंध्रप्रदेश संघाचा पराभव केला.
च्पुरूषांच्या ‘अ’ गटातील सामन्यात महाराष्ट्राने पुड्डूचेरीचा (२२-३, ०-३), २२-६ असा १ डाव व १६ गुणांनी धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या अमोल जाधवने २.३० मि संरक्षण करून आक्रमणात ४ गडी टिपले त्याला नरेश सावंत (२.३० मि. नाबाद), दिपेश मोरे (२.१५मि), प्रयाग कनगुटकर (२.५०मि) व राहूल घुटे (२.१०मि) यांनी छान साथ दिली, आक्रमणात बाळासाहेब पोकार्डे व युवराज जाधवने प्रत्येकी ४ गडी तर मनोज पवारने ३ गडी टिपले.
च्महिहलांच्या ‘ब’ गटातील सामन्यात महाराष्ट्राने आंध्रप्रदेश वर (८-२, ०-२), ८-४ अशी १ डाव व ४ गुणांनी मात केली. प्रियांका येळे (४मि), सारिका काळे (३.३०मि नाबाद), श्वेता गवळी (३.३०मि), सुप्रिया गाढवे (३.३०मि), कविता घाणेकर (२.३०मि), श्रुती सकपाळ (२मि नाबाद) व मिनल भोईर (३ गडी) या विजयाचा प्रमुख शिल्पकार होत्या.

च्महिलांच्या ४ बाय १०० मीटर मिडले रिलेमध्ये महाराष्ट्राच्या आरती घोरपडे, मोनिका गांधी, ज्योत्स्ना पानसरे व अदिती घुमटकर या चार जलपरींनी ४:३२.३८ अशी वेळ नोंदविताना नवीन विक्रमाची नोंद करून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.

च्कन्नूर येथे सुरूअसलेल्या कुस्ती स्पर्धेच्या ग्रीको रोमन प्रकारात पुरुषांत ९८ किलो वजनगटात महाराष्ट्राच्या महेश मोहोळने रौप्य पदक मिळवले.

 

Web Title: Ratka, gold with a record of aspiration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.