रवी शास्त्री यांचा ICC क्रिकेट कमिटीमधून राजीनामा
By admin | Published: July 1, 2016 04:31 PM2016-07-01T16:31:21+5:302016-07-01T16:33:41+5:30
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी आयसीसी क्रिकेट कमिटीमधून प्रसारमाध्यम प्रतिनिधी पदाचा राजीनामा दिला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 01 - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी आयसीसी क्रिकेट कमिटीमधून राजीनामा दिला आहे. रवी शास्त्री यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधी पदाचा राजीनामा देऊन पुन्हा एकदा आपली नाराजी जाहीर केली आहे असं बोललं जात आहे. कोच पदावरून रवी शास्त्री आणि सौरव गांगुली या भारताच्या दोन माजी कर्णधारांमध्ये गेले काही दिवस शाब्दिक युद्ध रंगले आहे.
रवी शास्त्री गेली 6 वर्ष आयसीसी क्रिकेट कमिटीचा प्रसारमाध्यम प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. रवी शास्त्रीने अगोदरच राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. तसंच आयसीसी चेअरमन शशांक मनोहर यांना पत्र लिहून या पदावरुव बाजूला होण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
अनिल कुंबळे मुख्य कोच बनल्यानंतर शास्त्री यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करीत वादाला तोंड फोडले होते. मी मुलाखत देत असताना तीन सदस्यीय पॅनलमधील सौरभ गांगुली याने अनुपस्थिती दर्शवीत माझा अपमान केल्याची भावना शास्त्रीने व्यक्त केली होती. याप्रकरणी कुणीही माघार घ्यायला तयार नाही.
रागावलेल्या गांगुलीने शास्त्रीवर शाब्दिक वार केला. त्याने रवी शास्त्री यांच्या मुलाखतीच्या वेळी बँकॉकमध्ये सुट्या घालविण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढले. तो म्हणाला,माझ्या मते, शास्त्रीची टीका फारच वैयक्तिक आहे. रवीला वाटते की, कोच न बनण्यामागे गांगुलीची भूमिका आहे तर तो हवेत उड्या मारत आहे, असे समजायला हवे. कोच बनण्याची त्याला कळकळ असती तर बँकॉकमध्ये सुट्या घालवायला जाणे आवश्यक होते का? पुढच्या वेळी कोचच्या मुलाखतीसाठी येईल तेव्हा गांगुलीने उपस्थित राहायला हवे, असा शास्त्री मला सल्ला देतो. मला राग येणे स्वाभाविक आहे', असं सौरभ गांगुली बोलला होता.