रवी शास्त्रींचा दबदबा ! भरत अरूण टीम इंडियाचे नवे बॉलिंग कोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 03:54 PM2017-07-18T15:54:40+5:302017-07-18T21:49:01+5:30

टीम इंडियाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गोलंदाजी प्रशिक्षकासाठी भरत अरुण यांना पसंती दर्शवल्याने

Ravi Shastri's suppression! Bharat Arun is the new bowling coach of India | रवी शास्त्रींचा दबदबा ! भरत अरूण टीम इंडियाचे नवे बॉलिंग कोच

रवी शास्त्रींचा दबदबा ! भरत अरूण टीम इंडियाचे नवे बॉलिंग कोच

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 18 - टीम इंडियाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गोलंदाजी प्रशिक्षकासाठी भरत अरुण यांना पसंती दर्शवल्याने गोलंदाजी प्रशिक्षकापदी भरत अरूण यांचीच निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2019 च्या विश्वचषकापर्यंत अरूण यांची निवड करण्यात आली आहे.  याशिवाय संजय बांगरची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तसंच क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून आर.श्रीधर यांची निवड झाली आहे.

रवी शास्त्रींना आपल्या आवडीचा स्टाफ हवा होता. त्यामुळे झहीरऐवजी त्यांनी आपल्या जवळचा मित्र भरत अरुणच्या नावाची गोलंदाजी कोच म्हणून शिफारस केली होती.  यापुर्वी क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) राहुल द्रविडला परदेश दौऱ्यावर फलंदाजी सल्लागार आणि झहीरला गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त केलं होतं. बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना, सचिव अमिताभ चौधरी यांच्या उपस्थितीत मुंबई मुख्यालयात आज बीसीसीआयची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  

कोण आहेत भरत अरुण-
भरत अरुण हे २०१४ पासून गोलंदाजी कोच होते. २०१६ ला शास्त्री यांना बाहेर करेपर्यंत ते संघासोबतच होते. अरुण यांची खेळाडू म्हणून कारकीर्द फारशी गाजली नाही; पण उत्कृष्ट अकादमी कोच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. वेगवान माऱ्यासंदर्भात त्यांचा चांगला अभ्यास आहे. शास्त्री आणि अरुण हे १९८० च्या दशकात १९ वर्षांखालील संघांपासून घनिष्ट मित्र आहेत. शास्त्री यांच्या शिफारशीवरुन तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी अरुण यांना सिनियर संघाचे गोलंदाजी कोच बनविले. त्या वेळी अरुण हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गोलंदाजी सल्लागार पदावर कार्यरत होते.

 

Web Title: Ravi Shastri's suppression! Bharat Arun is the new bowling coach of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.