चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात असं करणारा रविंद्र जाडेजा पहिलाच
By Admin | Published: June 15, 2017 09:53 PM2017-06-15T21:53:30+5:302017-06-15T21:53:30+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुस-या सेमी फायनलमध्ये बांगलादेशला 9 गड्यांनी चिरडत भारताने फायनलमध्ये थाटात धडक मारली.
>
ऑनलाइन लोकमत
बर्मिगहॅम, दि. 15 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुस-या सेमी फायनलमध्ये बांगलादेशला 9 गड्यांनी चिरडत भारताने फायनलमध्ये थाटात धडक मारली. बांगलादेशने दिलेल्या 265 धावांच्या आव्हानाचा भाराताने 59 चेंडू शिल्लक ठेवत लिलया पाठलाग केला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही बाबींमध्ये भारत बांगलादेशपेक्षा वरचढ ठरला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणा-या बंगलादेशच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत बांगलादेशला 264 धावांवर रोखलं. या सामन्यात भारताकडून आर.अश्विन आणि हार्दिक पांड्या वगळता इतर सर्वच गोलंदाजांना यश मिळालं.
अष्टपैलू जाडेजानेही या सामन्यात एक गडी मिळवत आपली निवड सार्थ ठरवली. यासोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सलग 10 ओव्हर टाकण्याचा विक्रम रविंद्र जाडेजाने आपल्या नावावर नोंदवला आहे, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात असं करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे.