आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रविंद्र जडेजाचे संघात पुनरागमन
By Admin | Published: October 19, 2015 04:14 PM2015-10-19T16:14:23+5:302015-10-19T16:14:23+5:30
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामने व कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची सोमवारी निवड करण्यात आली.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामने व कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची सोमवारी निवड करण्यात आली. वन डे संघात उमेश यादवऐवजी एस अरविंद याचा समावेश करण्यात आला असून कसोटी संघात रविंद्र जडेजाने पुनरागमन केले आहे.
दक्षिण आफ्रिका संघ सध्या भारत दौ-यावर असून टी - २० मालिकेत आफ्रिकेने बाजी असून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने २ - १ अशी आघाडी घेतली आहे. उर्वरित दोन एकदिवीय सामने व कसोटी मालिकेसाठी सोमवारी भारतीय संघाची निवड कऱण्यात आली. दिल्लीत निवड समितीचे प्रमुख संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. श्रीलंका दौ-यात भारतीय संघातून वगळण्यात आलेल्या रविंद्र जडेजाला कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.तर हरभजन सिंगला मात्र कसोटी संघातून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भारतीय कसोटी संघ ( पहिल्या दोन सामन्यांसाठी)
विराट कोहली - कर्णधार, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धीमान साहा, रविंद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, के एल राहुल, स्टुअर्ट बिन्नी, वरुण अॅरोन, इशांत शर्मा
उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ
महेंद्रसिंह धोनी - कर्णधार, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायडू, मोहित शर्मा, रोहित शर्मा, एस अरविंद, गुरकिरत सिंग, अमित मिश्रा, हरभजन सिंग.