केकेआरच्या गोलंदाजांना आरसीबीचे चॅलेंज
By admin | Published: April 23, 2017 02:58 AM2017-04-23T02:58:09+5:302017-04-23T02:58:09+5:30
घरच्या मैदानावर दारुण पराभव होताच स्तब्ध झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांना आयपीएल-१० मध्ये आज रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांकडून
कोलकाता : घरच्या मैदानावर दारुण पराभव होताच स्तब्ध झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांना आयपीएल-१० मध्ये आज रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांकडून जबर आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
फलंदाजांना पूरक असलेल्या ईडनच्या खेळपट्टीवर ख्रिस गेल-विराट कोहली यांना रोखणे गंभीरसाठी डोकेदुखी ठरणार आहे. पाचपैकी चार सामने जिंकणाऱ्या केकेआरला रैनाच्या शानदार खेळीमुळे गुजरातने पराभवाची चव चाखविली होती. मागच्या सामन्यात कोहलीसोबत डावाची सुरुवात करीत गेलने १२२ धावांची भागीदारी केली, शिवाय टी-२० त १० हजार धावा पूर्ण केल्या. शाकीब अल हसनने १०.३३ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत. त्याची जागा ट्रेंट बोल्ट घेऊ शकतो. गुजरात लायन्सने काल केकेआरविरुद्ध १० चेंडू शिल्लक राखून १८८ धावांचे लक्ष्य सहज गाठले होते. अतिरिक्त फलंदाज खेळविण्याच्या चढाओढीत केकेआरने अतिरिक्त यष्टिरक्षक रॉबिन उथप्पा याला खेळविले होते. पण तो कमाल करू शकला नाही. त्याने रैनाचा झेलदेखील सोडला. उथप्पाला यष्टिरक्षणाच्या जबाबदारीतून मोकळे केले जाऊ
शकते तर सूर्यकुमारची जागा शेल्डन जॅक्सन घेण्याची शक्यता नाकारता
येत नाही. (वृत्तसंस्था)