आरसीबीला लायन्सविरुद्ध विजयाची आशा

By admin | Published: April 27, 2017 12:53 AM2017-04-27T00:53:10+5:302017-04-27T00:56:01+5:30

फलंदाजांकडून होत असलेल्या ढिसाळ कामगिरीपाठोपाठ एक सामना पावसात वाहून गेल्याने आयपीएल-१० मध्ये अडचणीत

RCB hope to win against Lions | आरसीबीला लायन्सविरुद्ध विजयाची आशा

आरसीबीला लायन्सविरुद्ध विजयाची आशा

Next

बेंगळुरु: फलंदाजांकडून होत असलेल्या ढिसाळ कामगिरीपाठोपाठ एक सामना पावसात वाहून गेल्याने आयपीएल-१० मध्ये अडचणीत आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पुढील वाटचालीसाठी उर्वरित सहापैकी प्रत्येक सामना जिंकणे क्रमप्राप्त झाले आहे. आज गुरुवारी त्यांची गाठ पडेल ती गुजरात लायन्सविरुद्ध.
आरसीबी ‘प्ले आॅफ’च्या दौडमधून बाहेर पडणार नाही, याची काळजी त्यांच्या फलंदाजांना घ्यावीच लागेल. काल हैदराबादविरुद्धची लढत पावसात वाहून जाताच आठ सामन्यात दोन विजयातून या संघाकडे केवळ पाच गुण आहेत. केकेआरविरुद्ध हा संघ केवळ ४९ धावांत गारद झाला. ईडनवरील या निचांकी कामगिरीदरम्यान एकही फलंदाज संघाच्या मदतीला धावून आला नव्हता. कर्णधार विराट कोहलीने चार सामन्यात १५४, ख्रिस गेलने पाच सामन्यात १४४ आणि डिव्हिलियर्सने चार सामन्यात केवळ १४५ धावा केल्या आहेत. कोहली अ‍ॅन्ड कंपनीला बाद फेरी गाठण्याची अद्यापही संधी आहे. गुजरात लायन्स संघ फारसा प्रभावी ठरलेला नाही. त्यांच्यावर विजय नोंदविण्यासोबतच अन्य पाच सामने जिंकून कामगिरी सुधारायची झाल्यास फलंदाजांना शंभर टक्के योगदान द्यावे लागेल.
लायन्सचे सात सामन्यात चार गुण आहेत. या संघाची फलंदाजी तितकी प्रभावी ठरलेली नाही. आघाडीचे फलंदाज अधूनमधून मात्र चमकले. जखमी ड्वेन ब्राव्होऐवजी संघात आलेला इरफान पठाण हा अंतिम एकादशमध्ये खेळेल का, हे पाहणे रंजक ठरेल. १०२ आयपीएल सामने खेळलेल्या इरफानच्या ११३७ धावा आणि १०२ बळी आहेत. यंदा इरफानला लिलावात कुणीही खरेदी केले नव्हते. मागच्या सामन्यात गुजरातने केकेआरवर विजय नोंदविला होता. तेच डावपेच आरसीबीविरुद्ध वापरण्याची कर्णधार सुरेश रैनाची इच्छा असेल. रैनावर पुन्हा एकदा संघाची भिस्त असेल. ब्रँडन मॅक्यूलम, अ‍ॅरोन फिंच यांच्याकडूनही धावांची अपेक्षा राहील.
गोलंदाजी ही गुजरातसाठी मुख्य समस्या ठरते. या संघाच्या गोलंदाजांनी सहा सामन्यात केवळ २६ गडी बाद केले. हॅट्ट्रिक घेणारा अ‍ॅण्ड्र्यू टाय पूर्णपणे फिट नाही तर रवींद्र जडेजा अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात अपयश्ी ठरला. प्रवीण कुमारचा मारा काहीसा बोथट झाला आहे. केवळ बासिल थम्बी याचा वेगवान मारा आतापर्यंत प्रभावी जाणवला. (वृत्तसंस्था)

Web Title: RCB hope to win against Lions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.