आरसीबी काढणार का पराभवाचे उट्टे
By admin | Published: May 7, 2017 12:42 PM2017-05-07T12:42:41+5:302017-05-07T12:42:41+5:30
आयपीएलच्या दहाव्या सत्रात रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्सचा या आधीच्या सामन्यात विराट सेनेला दारुण पराभव स्विकारावा लागला होता.
Next
>आकाश नेवे / आॅनलाईन लोकमत
बंगळुरु, दि. 7 - आयपीएलच्या दहाव्या सत्रात रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्सचा या आधीच्या सामन्यात विराट सेनेला दारुण पराभव स्विकारावा लागला होता. ४९ या निचांकी धावसंख्येची नोंद आरसीबीने केली होती. त्यामुळे तळाच्या स्थानावर असलेला आरसीबी आता केकेआरवर या पराभवाचे उट्टे काढणार का, केकेआरला प्लेआॅफमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. त्यामुळे केकेआर फॉर्ममध्ये नसलेल्या या संघावर पुन्हा एकदा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.
या आधीच्या सामन्यात केकेआरच्या डी ग्राण्ड होमचा भेदक मारा कोहली विसरणार नाही. त्याने फक्त १० चेंडूत चार धावा देत ३ गडी बाद करण्याची कामगिरी केली होती. तर कुल्टर नाईल, उमेश यादव, ख्रिस व्होक्स यांना तोंड देताना आरसीबीचा दाणदाण उडाली होती. या चौकडीने आरसीबीला आसमान दाखवले होते.
गौतम गंभीरच्या आक्रमक नेतृत्वाने इतर संघांना अडचणीत आणले आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग असो किंवा कमी धावसंख्येचा बचाव, गंभीर मैदानावर आपल्या रणनितीचा अमंल योग्य पद्धतीने करण्यात आतापर्यंत अपवाद वगळता
यशस्वी ठरला आहे. सुनील नरेन, ख्रिस लीन यांना पार्ट टाईम ओपनर म्हणून पाठवल्यानंतर एक चांगली सुरूवात केकेआरला मिळते. त्याचा फायदा घेत गंभीर आणि उथप्पा संघाला मोठी धावसंख्या उभारुन देतात. मधली फळी मनिष पांडे आणि युसुफ
पठाणमुळे मजबूत आहे. सुर्यकुमार यादव आणि शेल्डन जॅक्सन यांच्यापैकी ज्याला संधी मिळेल त्याला मात्र त्याचे सोने करावे लागेल. फलंदाजीतील उच्चांक गाठणा-या आरसीबीला आता निचांकी धावसंख्या पहावी लागत आहे. गोलंदाजीचा विचार करता शेन वॉटसन हा स्पर्धेत संघासाठी फायदेशीर ठरलेला नाही. त्याने नेहमीच जास्त धावा दिल्या आहेत. त्या ऐवजी चहल,
अनिकेत चौधरी, पवन नेगी, सॅम्युअल बद्री हे फायदेशीर गोलंदाज ठरले आहेत. प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या आरसीबीला या सामन्यातील पराभवाने गमावण्यासारखे काहीही नाही. मात्र त्यांचा हा तेरावा सामना असल्याने या स्पर्धा संपण्यापुर्वी किमान सन्मानजनक निरोप घ्यावा, अशी अपेक्षा विराट कोहली नक्कीच बाळगून असले.