आरसीबीचा रोमांचक विजय

By admin | Published: May 9, 2016 11:50 PM2016-05-09T23:50:31+5:302016-05-10T00:19:11+5:30

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात दडपणाखाली आलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला अवघ्या एका धावेने नमवून रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने थरारक विजय मिळविला

RCB's exciting triumph | आरसीबीचा रोमांचक विजय

आरसीबीचा रोमांचक विजय

Next

मोहाली : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात दडपणाखाली आलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला अवघ्या एका धावेने नमवून रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने थरारक विजय मिळविला. अखेरच्या षटकात १७ धावांची आवश्यकता असताना पंजाबला ख्रिस जॉर्डनच्या षटकात १५ धावा काढता आल्या. 
आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये झालेल्या या थरारक सामन्यात नाणेफेक जिंकून यजमान पंजाबने बँगलोरला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केले. बँगलोरने एबी डिव्हिलियर्सच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १७५ धावांची आव्हानात्मक मजल मारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची झुंज अवघ्या एका धावेने अपुरी पडली. कर्णधार मुरली विजयने ५७ चेंडूंत १२ चौकार व एका षटकारासह शानदार ८९ धावांची खेळी करून पंजाबच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र, शेन वॉटसनने त्याला बाद करून पंजाबला मोठा धक्का दिला. हाशिम आमला (२१), वृद्धिमान साहा आणि डेव्हिड मिल्लर (०) विशेष चमक न दाखवता परतल्यानंतर मार्कस स्टोइनीसने २२ चेंडंूत ३४ धावा तडकावून संघाला विजयी मार्गावर नेले. परंतु, अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना त्याला केवळ २ धावा काढण्यात यश आले.
तत्पूर्वी, लोकेश राहुल व कर्णधार विराट कोहली यांनी संघाला ६३ धावांची आक्रमक सलामी दिली. मात्र, केसी करिअप्पाने आठव्या षटकात तिसऱ्या व पाचव्या चेंडूवर अनुक्रमे राहुल व कोहलीला बाद करून पंजाबला मजबूत पकड मिळवून दिली. राहुलने २५ चेंडंूत ६ चौकार व एका षटकारासह ४२ धावा चोपल्या. कोहलीने २१ चेंडंूत २० धावा काढल्या. वॉटसनही झटपट बाद झाल्याने बँगलोरची ३ बाद ६७ अशी अवस्था झाली. परंतु, डिव्हिलियर्स व सचिन बेबी यांनी ८८ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. डिव्हिलियर्सने ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ६४ धावा फटकावल्या. बेबीने २९ चेंडूंत ३३ धावा केल्या. ा
संक्षिप्त धावफलक :
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : २० षटकांत ६ बाद १७५ धावा (एबी डिव्हिलियर्स ६४, लोकेश राहुल ४२, सचिन बेबी ३३; केसी करिअप्पा २/१६, संदीप शर्मा २/४९) वि.वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ४ बाद १७४ धावा (मुरली विजय ८९, मार्कस स्टोइनीस ३४; शेन वॉटसन २/२२).

 

Web Title: RCB's exciting triumph

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.