प्लॅस्टिक जर्सीतल्या मेस्सी चाहत्याला मिऴाली रिअल मेस्सी जर्सी

By Admin | Published: February 2, 2016 09:16 PM2016-02-02T21:16:03+5:302016-02-02T21:38:37+5:30

सध्या जगभरात फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे चाहते दिसून येत आहेत. पण या चाहत्यांमध्ये एक खास चाहता असा आहे की,त्याचे वय अवघे पाच वर्ष आहे. विशेष म्हणजे खेळांविषयी

Real Messi Jersey, which brings Messi fans to plastic jerseys | प्लॅस्टिक जर्सीतल्या मेस्सी चाहत्याला मिऴाली रिअल मेस्सी जर्सी

प्लॅस्टिक जर्सीतल्या मेस्सी चाहत्याला मिऴाली रिअल मेस्सी जर्सी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - सध्या जगभरात फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे चाहते दिसून येत आहेत. पण या चाहत्यांमध्ये एक खास चाहता असा आहे की,त्याचे वय अवघे पाच वर्ष आहे. विशेष म्हणजे खेळांविषयी कमी प्रभाव असलेल्या प्रातांत राहणारा असून तो लिओनेल मेस्सीचा मोठा चाहता आहे. गेल्या एका रात्री तो जगभरातील काना-कोप-यात पोहचला. 
मुर्तझा अहमदी असे या मुलाचे नाव आहे. त्याने प्लॅस्टिकने तयार केलेली बार्सिलोना जर्सी परिधान केलेला फोटो इंटरनेटवर व्हॉयरल झाला आणि त्याची दखल खुद्द मेस्सीने घेऊन त्याला रिअल मेस्सी जर्सी दिली आहे.  
मुर्तझा हा काबूलमधील नैऋत्येकडील गझनी प्रातांत राहतो. तो मेस्सीचा मोठा चाहता असल्याने त्याची मेस्सीसारखी जर्सी घालून खेळण्याची खूप इच्छा होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला जर्सी मिळाली नाही.  मात्र, त्याला त्याच्या भावाने मदत केली.  त्याच्या भावाने अर्जेटिनाच्या फुटबॉल संघाच्या गणवेशाप्रमाणे निळा आणि पांढऱ्या पट्टया असलेली प्लॅस्टिकची जर्सी तयार केली आणि त्यावर पेनाने मेस्सी असे लिहून त्याला दिली. त्यानंतर मुर्तझा ही जर्सी परिधान करुन खेळतानाचा एक फोटो इंटरनेटवर व्हॉयरल झाल्यानंतर खुद्द मेस्सीने या चाहत्याची दखल घेत भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मेस्सी या चाहत्याला भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे अफगाणिस्तान फुटबॉल महासंघाने सांगितले. त्यानंतर काही वेळातच मेस्सीने त्याची भेट घेऊन घेऊन त्याला रिअल मेस्सी जर्सी दिली आहे. याबाबत मेस्सीने ट्विट केले आहे.