केकेआरची खरी परीक्षा मुंबईविरुद्धच

By admin | Published: May 11, 2017 12:39 AM2017-05-11T00:39:25+5:302017-05-11T00:39:25+5:30

आयपीएलचे यंदाचे सत्र निर्णायक वळणावर पोहोचले आहे. केकेआरची आघाडीच्या चार संघांत स्थान मिळविण्याची धडपडदेखील सुरू आहे.

The real test of KKR is against Mumbai | केकेआरची खरी परीक्षा मुंबईविरुद्धच

केकेआरची खरी परीक्षा मुंबईविरुद्धच

Next

सौरभ गांगुली लिहितो...
आयपीएलचे यंदाचे सत्र निर्णायक वळणावर पोहोचले आहे. केकेआरची आघाडीच्या चार संघांत स्थान मिळविण्याची धडपडदेखील सुरू आहे. केकेआर ‘नॉक आऊट’मध्ये स्थान मिळवेल, अशी मला खात्री आहे. पण, मुंबईविरुद्ध केकेआरचा पराभव झाल्यास आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्, सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाबने आपापले सामने जिंकल्यास केकेआरला धावसरासरीवर विसंबून राहावे लागेल. केकेआरला ही परिस्थिती ओढवून घेणे परवडण्यासारखे नाही.
मुंबई इंडियन्स पकड कायम ठेवण्याच्या निर्धाराने उतरणार असून विजयासह साखळी सामने संपवायचे आणि गुणतालिकेत नंबर वन बनायचे असा संघाचा प्रयत्न आहे. केकेआरच्या सलामीला सुनील नारायण धडाका करीत असला तरी पुढील सामन्यात डावाचा प्रारंभ गौतम गंभीरकडूनच करण्याचे संघाचे प्रयत्न असतील. गंभीर खेळपट्टीवर स्थिरावल्यास दुसऱ्या टोकावर असलेल्या ख्रिस लीनसोबत सामना संपवू शकतो. ईडनच्या नव्या खेळपट्टीवर गोलंदाजांना उसळी आणि वेग दोन्ही मिळविणे शक्य होत आहे. मुंबई इंडियन्सला हेच हवे आहे. पोलार्ड, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि नीतेश राणा हे सर्व जण चेंडू बॅटवर घेणे पसंत करतात. मुंबई संघ या स्पर्धेत गोलंदाजी व फलंदाजीत सर्वाधिक संतुलित आहे. बुमराह, जॉन्सन, मॅक्लेनघन, मलिंगा असे एकाहून एक सरस गोलंदाज असून फिरकीसाठी अनुभवी हरभजन आहेच. मुंबईकडे फलंदाजीतही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हार्दिक पांड्यासारखा फलंदाज सातव्या किंवा आठव्या स्थानावर खेळायला येत आहे. केकेआर गोलंदाजीचा वापर कसा करतो, हे पाहणे रंजक ठरेल. केकेआरकडे उमेश यादव, कुल्टर नाईल आणि बोल्टसारखे वेगवान गोलंदाज आहेत. या सर्वांनी आरसीबीला उद्ध्वस्त केले होते. नारायण आणि कुलदीप यादवसारख्यांना कसे विसरता येईल. केकेआरविरुद्ध मुंबई या लढतीत उभय संघाच्या संयमाची परीक्षा असेल. जो संघ अखेरपर्यंत संयम टिकवेल, तो बाजी मारण्यात यशस्वी ठरेल. किंग्ज पंजाबने केकेआरला कडवे आव्हान देत चकित केले. पण अखेरच्या ४ संघांत कायम राहण्यासाठी त्यांना अखेरचे दोन्ही सामने जिंकणे क्रमप्राप्त झाले आहे. सनरायझर्सला पावसाच्या व्यत्ययामुळे थोडा लाभ झालेला दिसतो. तरीही गतविजेता असलेला हा संघ ‘मस्ट विन’ स्थितीत आहे. गुरुवारी सनरायझर्सला विजय मिळविण्याशिवाय पर्याय नाही. (गेमप्लान)

Web Title: The real test of KKR is against Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.