भारताच्या पराभवाची आणि पाकिस्तानच्या विजयाची ही आहेत कारणे

By admin | Published: June 19, 2017 07:10 AM2017-06-19T07:10:16+5:302017-06-19T07:10:16+5:30

आतापर्यंत तलवारीसारख्या तळपणाऱ्या भारतीय फलंदाजांची कामगिरी पाकपेक्षा सरस ठरेल असेच वाटले होते. विराट कोहलीसह त्याचे शेरही ढेर झाले.

The reasons for India's defeat and the victory of Pakistan are | भारताच्या पराभवाची आणि पाकिस्तानच्या विजयाची ही आहेत कारणे

भारताच्या पराभवाची आणि पाकिस्तानच्या विजयाची ही आहेत कारणे

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. पाकिस्तानने सर्वच स्तरावर भारतापेक्षा वरचढ कामगिरी करत विजय मिळवला. भारताच्या पराभवानंतर सर्वच ठिकाणी भारतीय संघातील खेळाडूंवर टीका होत आहे. भारतीय संघ आपेक्षांच्या ओझ्याखाली दबला गेला का? भारतीय गोलंदाजी सोबतच फलंदीजीमध्ये कुठे चुकला याबद्दल बऱ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. आतापर्यंत तलवारीसारख्या तळपणाऱ्या भारतीय फलंदाजांची कामगिरी पाकपेक्षा सरस ठरेल असेच वाटले होते. विराट कोहलीसह त्याचे शेरही ढेर झाले. त्यानंतर या पराभवाची कारणे काय आहेत हे अनेकजण शोधत आहेत. भारताच्या दारुण पराभवाची आणि पाकिस्तानच्या विजयात काय फरक होता. भारत कुठे कमी पडला याची काय कारणं आहेत जाणून घेऊयात..
सामन्याचे विश्लेषन केले असता भारताची पहिली चूक कोणती असेल तर पाकिस्तानी फलंदाजांना भागिदारी करण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यांनी संयमी फलंदाजी केली. संथ सुरुवातीनंतर आक्रमक धावा जमावल्या. बुमराह आणि भुवनेश्वरने धावा रोखल्या पण बळी घेण्यात अपयशी ठरले. त्यामुळे पाकिस्तानला चांगली सलामी मिळाली. मोठ्या धावसंखेचा पाया रचला गेला. पंड्याने दहा षटकांत60 च्या आत धावा दिल्या असल्या तरी सुरुवातीला त्याने आणि बुमराहने दिशाहीन मारा केला. पंड्याला संघात तिसरा वेगवान गेलंदाज म्हणून स्थान दिले होते.
भारताची फिरकी जोडी अपयशी ठरली. आर. अश्विनच्या गोलंदाजीचा पाक संघांनी पुरेपूर समाचार घेताना धावा वसूल केल्या. आर आश्विन आणि रविंद्र जाडेजा यांचं फिरकी अस्त्र निकामी ठरण भारताच्या पराभवातील एक कारण आहे. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्यासमोर भारताचे रथी-महारथी फेल ठरले. भऱवश्याच्या म्हशीने टोनगा दिला म्हणतात त्याप्रमाणे भारतीय फलंदाजीच या सामन्यात झालं. जुनैद-आमिरच्या धारधार गोलंदाजीसमोर कोहली, रोहित शर्मा, धोनी, युवराज यांचं सपशेल लोटांगण घेतलं.
भारताच्या फलंदाजांसोबत विराटच्या कॅप्टनशीपबद्दलही अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तानच्या फलंदाजांकडून सपाटून मार खात असतानाही आर.अश्विनला सातत्याने गोलंदाजी देण्याच्या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. बांगलादेशविरूद्धच्या विजयात मोक्याच्या क्षणी दोन विकेट घेऊन सामन्याला कलाटणी देणा-या केदार जाधवला जवळपास 40 व्या षटकात विराटने गोलंदाजी दिली. डेथ ओव्हर्समध्ये पार्ट टाइम बॉलरला गोलंदाजी देणं योग्य नव्हतं. 
पाकिस्तानने सुरुवातीच्या भारताविरोधात झालेल्य पराभवातून धडा आपल्या कामगिरीती सुधारणा केली. आपल्या चूका त्यांनी सुधारल्या. आपले बलस्थान असेल्या विभागात त्यांनी आणखी भर देत ते मजबूत बनवलं. वेगवान आक्रमण या बलस्थानावर पाक गोलंदाजांनी भर दिला. प्रथम फलंदाजी करण्याच्या मिळालेल्या संधीचं पाकनं सोनं केलं. संथ सुरुवातीनंतर मोठ्या भागिदारी करत विराट धावसंध्या उभा केली. सर्वात महत्वाचे म्हणजे पाकिस्तानने आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा केली. अंतिम सामन्यात ती दिसून येत होती.
अंतिम सामन्यातील पराभवानंतर विराटसेनेन बोध घेत आपल्या कामगिरीत सुधारणा करायला हवी. अंतिम सामन्यात भारतीय संघ दबावात दिसून आला पहिल्या षटकांपासूनच पाकिस्तानचा संघ सर्वच क्षेत्रात भारतापेक्षा सरस असल्याचे दिसून आले.

Web Title: The reasons for India's defeat and the victory of Pakistan are

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.