बॉक्सिंगमध्ये पुनरागमन हा पुनर्जन्म - जितेंदर

By admin | Published: October 28, 2016 01:22 AM2016-10-28T01:22:42+5:302016-10-28T01:22:42+5:30

बॉक्सिंगमध्ये पुनरागमन करणे कधीही सोपे नसते; पण व्यावसायिक बॉक्सिंगमधील पदार्पण हा स्वत:चा पुनर्जन्म मानतो, असे स्टार बॉक्सर जितेंदरचे मत आहे. जितेंदर

Rebirth in boxing - Reincarnation - Jitender | बॉक्सिंगमध्ये पुनरागमन हा पुनर्जन्म - जितेंदर

बॉक्सिंगमध्ये पुनरागमन हा पुनर्जन्म - जितेंदर

Next

नवी दिल्ली : बॉक्सिंगमध्ये पुनरागमन करणे कधीही सोपे नसते; पण व्यावसायिक बॉक्सिंगमधील पदार्पण हा स्वत:चा पुनर्जन्म
मानतो, असे स्टार बॉक्सर जितेंदरचे मत आहे. जितेंदर हा हरियाणा पोलीसमध्ये उपअधीक्षकपदावर कार्यरत आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २००६मध्ये कांस्यविजेता असलेल्या जितेंदरने आयओएससोबत गुरुवारी करार केला. ही कंपनी आशिया व्यावसायिक बॉक्सिंग चॅम्पियन विजेंदरचीदेखील प्रमोटर आहे. भिवानीचा रहिवासी असलेला जितेंदर म्हणाला, ‘‘माझ्यासाठी बॉक्सिंग रिंकमधील पुनरागमन पुनर्जन्मासारखेच आहे. माझे मेंटर अखिलकुमार यांचे प्रयत्न तसेच विजेंदरसिंग याच्या प्रेरणेमुळे हे शक्य होऊ शकले.’’
२८ वर्षांच्या जितेंदरची नियुक्ती सध्या पंचकुला येथे झाली आहे. तो म्हणाला, ‘‘पोलिसाची नोकरी माझे आवडते क्षेत्र आहे. मधुबनी येथे प्रशिक्षणादरम्यान मी गुन्हेगारी कायद्याचा अभ्यास केला; पण बॉक्सिंगपासून कधीही दूर
झालो नाही. बीजिंगपाठोपाठ मी २००९च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. त्यानंतर विश्व बॉक्सिंग सिरीजमध्ये २०११मध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत डोळ्याच्या वरच्या भागाला जखम झाल्याने माघार घ्यावी लागली होती. चुकीच्या वेळी जखम झाल्याने बाहेर पडावे लागले. शिवाय, फ्लायवेटमधून बँटमवेटमध्ये यावे लागले. यामुळे मेंटर अखिलकुमारच्याच गटात खेळण्याची वेळ आली होती. २०१०च्या आशियाई स्पर्धेसाठी निवड न झाल्याने बॉक्सिंगमधून माझा इंटरेस्ट कमी झाला होता; पण हरियाणा पोलीसमध्ये असताना पुन्हा
एकदा खेळाकडे वळलो आहे.’’ जितेंदर डिसेंबर महिन्यात व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये प्रवेश करणार
आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Rebirth in boxing - Reincarnation - Jitender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.