राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड समितीकडून खेळाडूंची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 04:32 IST2020-08-19T02:44:29+5:302020-08-19T04:32:38+5:30

२९ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली. राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

Recommendation of players from the selection committee for the National Sports Award | राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड समितीकडून खेळाडूंची शिफारस

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड समितीकडून खेळाडूंची शिफारस

नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यासाठी नेमलेल्या निवड समितीने पाच खेळाडूंची ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस केली. त्याचवेळी २९ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली. राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
राजीव गांधी खेलरत्न - रोहित शर्मा (क्रिकेट), विनेश फोगाट (कुस्ती), मनिका बत्रा (टेबल टेनिस), राणी रामपाल (हॉकी), मरियप्पन थंगवेलू (पॅरा अ‍ॅथलिट).
अर्जुन पुरस्कार - ईशांत शर्मा (क्रिकेट), अतनू दास (तिरंदाजी), दीपक हुड्डा (कबड्डी), दीपक ठाकूर (हॉकी), दिविज शरण (टेनिस), मीराबाई चानू (भारोत्तोलन), साक्षी मलिक (कुस्ती), आकाशदीप सिंग (हॉकी), लोवलीना बोरगोहेन (बॉक्सिंग), मनू भाकर (नेमबाजी), सौरभ चौधरी (नेमबाजी), मनीष कौशिक (बॉक्सिंग), संदेश झिंगन (फुटबॉल), दत्तू भोकनाळ (रोर्इंग), राहुल आवारे (कुस्ती), दुती चंद (अ‍ॅथ्लेटिक्स), दीप्ती शर्मा (क्रिकेट), शिवा केशवन (हिवाळी आॅलिम्पिक), मधुरिका पाटकर (टेबल टेनिस), मनीष नरवाल (पॅरा नेमबाजी), संदीप चौधरी (पॅरा अ‍ॅथ्लिट), सुयश जाधव (पॅरा जलतरण), चिराग शेट्टी व सात्विक साईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन), विशेष भृगवंशी (बास्केटबॉल), अजय सावंत (टेंट पेगिंग), अदिती अशोक (गोल्फ), सारिका काळे (खो-खो), दिव्या काकरान (कुस्ती).

Web Title: Recommendation of players from the selection committee for the National Sports Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.