दीपिकाची ‘खेलरत्न’साठी शिफारस
By admin | Published: May 13, 2015 12:06 AM2015-05-13T00:06:11+5:302015-05-13T00:06:11+5:30
भारताची स्टार स्क्वॅश खेळाडू दिपीका पल्लीकल ही आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीत दाखल झाली आहे. तामिळनाडू सरकारने दिपीकाच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी केली आहे.
नवी दिल्ली : भारताची स्टार स्क्वॅश खेळाडू दिपीका पल्लीकल ही आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीत दाखल झाली आहे. तामिळनाडू सरकारने दिपीकाच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी केली आहे.
तामिळनाडू खेळ विकास प्राधिकरणने पल्लीकलची शिफारस या पुरस्कारासाठी केंद्रीय क्रीडा विभागाला केली. त्याबाबतचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव पाठवला गेला त्यावेळी दिपीका जागतीक रॅकींगमध्ये ११ व्या क्रमांकावर होती सध्या ती १८ व्या क्रमांकावर आहे. चेन्नईत जन्माला आलेली दिपीका ही फक्त २३ वर्षांची असून या आधी २०१२ मध्ये अर्जून पुरस्कार तर २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले आहे. दिपीकाने २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत जोशना च्या जोडीने सुवर्ण पदक पटकावले होते. या प्रकारात भारताचे हे पहिले पदक होते. त्यासोबतच २०१४ च्या आशियाई खेळातही दिपिकाने महिला एकेरीत कांस्यपदक पटकावले.
दिपीकासोबतच खेलरत्नच्या स्पर्धेत हॉकी खेळाडू सरदार सिंग, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, आघाडीचा गोल्फ खेळाडू जीव मिल्खा सिंग, पॅरालिम्पीकपटू देवेंद्र झजारिया, एच. गिरीशा आणि थाळीफेकपटू विकास गौडा आणि सीमा पूनिया यांचाही समावेश आहे.(वृत्तसंस्था)