चार-पाच महिन्यांत शिफारशी लागू होतील
By admin | Published: March 5, 2017 03:57 AM2017-03-05T03:57:30+5:302017-03-05T03:57:30+5:30
भारतीय क्रिकेट बोर्डात (बीसीसीआय) लोढा समितीच्या शिफारशी पूर्णपणे लागू होण्यास चार-पाच महिने लागतील, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या संचालनासाठी
सिंगापूर : भारतीय क्रिकेट बोर्डात (बीसीसीआय) लोढा समितीच्या शिफारशी पूर्णपणे लागू होण्यास चार-पाच महिने लागतील, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या संचालनासाठी नेमलेल्या प्रशासकीय समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय यांनी सांगितली.
न्यायालयाच्या निर्देशानुसार शक्यतो लवकरात लवकर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. भविष्यात बीसीसीआयचा कारभार लोढा समितीच्या शिफारशीनुसार नियमबद्ध पद्धतीने चालावा यासाठी आम्ही नियमावली तयार करीत आहोत, असे राय यांचे म्हणणे होते.
इन्स्टिट्यूट आॅफ साऊथ एशियन स्टडिज येथे एका परिषदेत
सहभागी झाल्यानंतर राय म्हणाले,
‘ही प्रक्रिया फार दीर्घकाळ चालणार नाही. पुढील चार-पाच महिन्यात संपूर्ण काम पूर्ण होईल.’
सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे कामकाज पाहण्यासाठी जानेवारीत माजी महालेखानियंत्रक राय
यांच्या नेतृत्वात चार सदस्यांचे प्रशासकीय पॅनल नेमले होते.
चार सदस्यांच्या प्रशासकीय समितीत राय यांच्यासोबत इतिहासकार रामचंद्र गुहा, आयडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ विक्रम लिमये तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी खेळाडू डायना एडलजी यांचा समावेश आहे.(वृत्तसंस्था)
बीसीसीआयच्या कॅलेंडरनुसारच क्रिकेटचे संचालन होत राहील. लोढा समितीच्या शिफारशी पूर्णपणे लागू व्हाव्यात याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. सुधारणावादी पाऊल लागू झाल्यानंतर लोकशाही पद्धतीने बीसीसीआय व्यवस्थापन समितीची निवड होत नाही तोपर्यंत प्रशृसकीय समिती काम करीत राहील.
-विनोद राय