पुण्यातील पराभव विसरून टीम इंडियाने मैदानात उतरावे
By admin | Published: March 3, 2017 08:10 PM2017-03-03T20:10:36+5:302017-03-03T21:01:03+5:30
बेंगळुरुमध्ये आॅस्ट्रेलियन संघ उंचावलेल्या मनोधैर्यासह मैदानात उतरणार आहे, यात कुणाचे दुमत नाही. भारतीय संघाच्या पुण्यातील कामगिरीवर बरीच चर्चा झालेली आहे. फलंदाज व गोलंदाज
Next
>- रवी शास्त्री लिहितो...
बेंगळुरुमध्ये आॅस्ट्रेलियन संघ उंचावलेल्या मनोधैर्यासह मैदानात उतरणार आहे, यात कुणाचे दुमत नाही. भारतीय संघाच्या पुण्यातील कामगिरीवर बरीच चर्चा झालेली आहे. फलंदाज व गोलंदाज कसे अपयशी ठरले आणि त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणाचा दर्जा कसा होता, यााबाबत चर्वितचर्वण झाले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे भारतीय संघ भरकटलेला भासला. आगामी पाच दिवस याचीच पुनरावृत्ती बघायला मिळाली तर आॅस्ट्रेलियन संघ येथे मालिका गमावणार नाही, हे निश्चित होईल.
मला असे म्हणायचे आहे की, कोहली अँड कंपनीने पुण्यातील कामगिरीबाबत अधिक विचार न करता बेंगळुरु कसोटीत चमकदार कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. ते करण्यासाठी मनात कुठेही किंतू परंतु नको. निराशा व राग यामुळे भारतीय संघाची कामगिरी भरकटू शकते. भारतीय संघ सध्या चांगले खेळण्याशिवाय फार पुढचा विचार करू शकत नाही.
पुणे कसोटीत स्टीव्ह ओकिफेच्या चमकदार कामगिरीनंतर भारतीय संघ आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेल्या तयारीकडे डोळेझाक करू शकत नाही. आॅस्ट्रेलियन संघाने दुबईमध्ये सराव केला. त्यांना येथील परिस्थितीची चांगली कल्पना आहे. आॅस्ट्रेलियन संघ तयारीला मूर्त रूप देण्यास सज्ज असल्याचे दिसून येत आहे. पुणे कसोटी सामन्यात त्याची प्रचिती आली. पाहुण्या संघाची फलंदाजी मजबूत भासत आहे. युवा रेनशॉ आणि हँड्सकोंब, दिग्गज ववॉर्नर, स्मिथ व मार्श बंधू यांच्या समावेशामुळे आॅस्ट्रेलियाची फलंदाजीची बाजू बळकट आहे. या संघाला स्थानिक फिरकीपटूंवर वर्चस्व गाजवण्याची संधी आहे.
बेंगळुरुमध्ये भारतीय संघाला पहिल्या चेंडूपासून विजयाचा निर्धार दाखवावा लागेल. यजमान संघाला प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक खेळाडूवर हल्लाबोल करावा लागणार आहे. पुणे कसोटीत भारतीय संघाची देहबोली निराशाजनक होती. वॉर्नर किंवा स्मिथ यांच्या मागे राहून काही साध्य होणार नाही. त्यांच्यावर हल्लाबोल करावा लागणार आहे. ओकिफविरुद्ध परंपरागत दृष्टिकोन राखून खेळण्याचा लाभ मिळणार नाही. भारतीय फलंदाजीचा भार केवळ एकट्या विराट कोहलीवर नाही. तळाच्या फलंदाजांनाही गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामगिरीत सातत्य राखावे लागणार आहे. जोपर्यंत यजमान संघ ‘नंबर वन’ दर्जाचे क्रिकेट खेळत नाही तोपर्यंत आॅस्ट्रेलियन संघाला वर्चस्व राखण्याची संधी कायम राहील. (टीसीएम)