याेग्यप्रकारे मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना विमानाबाहेर काढा, ‘डीजीसीए’चे निर्देश, विमान कंपन्या, विमानतळ संचालकांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:55 IST2021-03-14T04:08:07+5:302021-03-14T06:55:35+5:30
देशाच्या काही भागात काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘डीजीसीए’ने विमान कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. काही प्रवासी प्रवासादरम्यान काेराेना नियमावलीचे पालन करत नाही, असे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे.

याेग्यप्रकारे मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना विमानाबाहेर काढा, ‘डीजीसीए’चे निर्देश, विमान कंपन्या, विमानतळ संचालकांना सूचना
मुंबई :विमान प्रवासादरम्यान याेग्यप्रकारे मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना विमानातून उतरविण्याचे स्पष्ट निर्देश ‘डीजीसीए’ने सर्व विमान कंपन्यांना दिले आहेत. काेराेना नियमावलींचे काटेकाेर पालन करण्याच्या सूचनाही विमान कंपन्यांना दिल्या आहेत. (Remove passengers who do not wear masks properly, DGCA instructions, airlines, airport directors)
देशाच्या काही भागात काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘डीजीसीए’ने विमान कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. काही प्रवासी प्रवासादरम्यान काेराेना नियमावलीचे पालन करत नाही, असे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे. विमानतळ परिसरात तसेच विमानाच्या आत याेग्यप्रकारे मास्क न घालणे तसेच साेशल डिस्टन्सिंगचे पालन प्रवाशांकडून हाेत नसल्याचे ‘डीजीसीए’च्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे विमान कंपन्या तसेच विमानतळ संचालकांनाही ‘डीजीसीए’ने परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत.
वारंवार सूचना देऊनही प्रवाशांनी याेग्यप्रकारे मास्क न घातल्यास त्यांना विमानातून उतरविण्यात यावे तसेच अशा प्रवाशांवर ‘अनरुली’ प्रवासी म्हणून कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश ‘डीजीसीए’ने दिले आहेत.
स्पष्ट सूचना -
काेरेाना नियमावलीनुसार प्रवाशांनी विमानतळावर प्रवेश केल्यापासून प्रवास पूर्ण करून बाहेर पडेपर्यंत याेग्यप्रकारे मास्क घालणे आवश्यक आहे. नाकाच्या खाली मास्क घालू नये, अशा स्पष्ट सूचना आहेत.