देशाचे प्रतिनिधित्व करणे गाैरवास्पद : सानिया मिर्झा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 05:10 AM2021-07-03T05:10:06+5:302021-07-03T05:10:18+5:30
‘सध्यातरी माझे लक्ष विम्बल्डनवर आहे. यानंतर ऑलिम्पिक स्पर्धादेखील मोलाची आहे. विम्बल्डन आटोपताच सर्व लक्ष टोकिओ ऑलिम्पिककडे वळविणार आहे
उदय बिनिवाले
लंडन : ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यामुळे गर्व वाटतो, असे मत भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने व्यक्त केले.
विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीचा पहिला सामना जिंकल्यानंतर सानियाने इंग्रजी आणि हिंदीतून संवाद साधला. ती म्हणाली, ‘ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यास मी उत्सुक आहे. सलग चौथ्यांदा ऑलिम्पिकसारख्या क्रीडा महाकुंभात देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे मी स्वत:चे भाग्य समजते. स्वत:वर गर्वही वाटतो.’
‘सध्यातरी माझे लक्ष विम्बल्डनवर आहे. यानंतर ऑलिम्पिक स्पर्धादेखील मोलाची आहे. विम्बल्डन आटोपताच सर्व लक्ष टोकिओ ऑलिम्पिककडे वळविणार आहे. युवा खेळाडू अंकिता रैना हिच्यासोबत ऑलिम्पिक दुहेरीत मी खेळणार असल्याने याबाबतचे डावपेच लवकरच ठरतील,’ असेही सानियाने सांगितले.