आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं विनोद नाही - सचिनने शोभा डेंना सुनावले

By admin | Published: August 11, 2016 01:25 PM2016-08-11T13:25:39+5:302016-08-11T15:25:56+5:30

रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा अपमान करणा-या शोभा डेंना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चोख उत्तर दिलं आहे.

Representing your country is not a joke - Sachin said Shobha Danena | आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं विनोद नाही - सचिनने शोभा डेंना सुनावले

आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं विनोद नाही - सचिनने शोभा डेंना सुनावले

Next
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 11 - रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा अपमान करणा-या शोभा डेंना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चोख उत्तर दिलं आहे. रिओ ऑलिम्पिकचा गुडविल अॅम्बेसिडर असणा-या सचिन तेंडूलकरने शोभा डे यांना चोख उत्तर दिलं आहे. 'कोणत्याही खेळाडूसाठी ऑलिम्पिकमध्ये खेळणं सर्वात अवघड गोष्ट आहे, आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं विनोद नाही', अशा कडक शब्दांत सचिनने सुनावलं आहे.
 
'ऑलिम्पिकमध्ये एक मेडल जिंकावं यासाठी आपलं उत्तम देण्याचं प्रयत्न करत असतात. रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना माझा पाठिंबा आहे. वर्षानुवर्ष हे खेळाडू सराव करत असतात, आणि जेव्हा थोडक्यात संधी चुकते आणि पराभव होतो तेव्हा त्यांना नक्कीच वाईट वाटतं' असं मत सचिनने एका कार्यक्रमात व्यक्त केलं आहे. 
 
शोभा डेंच्या ट्विटवर बोलताना 'जेव्हा वेळ तुम्हाला साथ देत नाही, निकाल अपेक्षेप्रमाणे लागत नाही तेव्हा खरी आपल्याला पाठिंब्याची गरज असते', असं सचिनने सांगितलं आहे. 
 
शोभा डे यांनी आपल्या ट्विटमध्ये ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंवर टीका केली होती. 'भारतीय संघाचं केवळ एकच लक्ष्य आहे. रिओला जा, सेल्फी काढा आणि खाली हात परत या. हा संधी आणि पैशांचा अपव्यय आहे', असं ट्विट शोभा डेंनी केलं होतं. यानंतर शोभा डे यांच्यावर सोशल मिडियावरुन जोरदार टीका करण्यात आली होती. अनेक खेळाडूंनीही त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.
 

Web Title: Representing your country is not a joke - Sachin said Shobha Danena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.