स्पर्धा आयोजनाची जबाबदारी संघटनांच्या प्रतिनिधींवर महापालिकास्तरीय आंतरशालेय स्पर्धा : क्रीडा समितीच्या बैठकीत निर्णय
By admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:41+5:302015-08-26T23:32:41+5:30
जळगाव : महापालिकास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास महापालिकेने तयारी दाखवली आहे. त्याबाबत बुधवारी महापालिकेत बैठक पार पडली. त्यात आयोजनाची तयारी करण्यात आली. प्रत्येक स्पर्धेसाठी एका संघटनेच्या पदाधिकार्याची किंवा तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. संबधित तज्ज्ञ व्यक्तीला आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय मदत मिळेल.
Next
ज गाव : महापालिकास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास महापालिकेने तयारी दाखवली आहे. त्याबाबत बुधवारी महापालिकेत बैठक पार पडली. त्यात आयोजनाची तयारी करण्यात आली. प्रत्येक स्पर्धेसाठी एका संघटनेच्या पदाधिकार्याची किंवा तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. संबधित तज्ज्ञ व्यक्तीला आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय मदत मिळेल. महापालिकेच्या सभागृहात बुधवारी दुपारी ही बैठक पार पडली. या बैठकीला महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, नगरसेवक नितीन बरडे, खो - खो मार्गदर्शक गणपतराव पोळ, डॉ.प्रदीप तळवेलकर, महापालिकेचे क्रीडा अधिकारी किरण जावळे, राजेश जाधव, प्रशांत जगताप उपस्थित होते.महापालिका स्तरीय स्पर्धांचे वेळापत्रक या आधीच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने जाहीर केले होते. त्यानुसार या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धांची ठिकाणेही बदलली जाणार नाहीत. शासन निर्णयानुसार महापालिकेने या स्पर्धेच्या आयोजनाची व खर्चाची जबाबदारी घेतली आहे. त्यात आयोजन करणार्या संघटनेच्या प्रतिनिधींनी एका आठवड्याच्या आत महापालिकेला क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा संपूर्ण खर्च सादर करावा, असे नितीन बरडे यांनी स्पष्ट केले.त्यानंतर ज्या स्पर्धा घेण्याचे बाकी आहे, अशा स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी तज्ज्ञ व्यक्तींवर देण्यात आली. जिम्नॅस्टिक,तायक्वांदो, विनु मंकड क्रिकेट स्पर्धा यांची जबाबदारी प्रा.श्रीकृष्ण बेलोकर यांच्याकडे देण्यात आली आहे. वेट लिफ्टींग व पॉवर लिफ्टींगची जबाबादारी सचिन महाजन यांच्याकडे देण्यात आली आहे.महापालिका स्पर्धांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने क्रीडा संकूल वापरासाठीची फी कमी करावी, अशी मागणी नितीन बरडे यांनी क्रीडा अधिकार्यांकडे केली. त्यावर क्रीडा अधिकारी पाटील यांनीही संकुलाची पाणी पी आणि करात सुट द्या, असे वक्तव्य करताच सभागृहात हशा पिकला.इन्फो-खेळाडूंना भत्ता देण्याची मागणीआतंरशालेय क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हाभरातून खेळाडू येतात. शहराबाहेरील स्पर्धेसाठी शाळांनी १५० रुपये प्रति खेळाडू भत्ता द्यावा, तसेच शहरातील शाळांनी ७५ रुपये प्रती खेळाडू भत्ता द्यावा, अशी मागणी प्रदीप तळवेलकर यांनी केली. तसेच याबाबत शासनाचे परिपत्रक आहे. त्यानुसार शाळांना जिल्हा क्रीडा अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी पत्र देण्याची मागणीही तळवेलकर यांनी केली.