बोल्टचे ‘रियो’नंतर निवृत्तीचे संकेत
By Admin | Published: August 29, 2015 12:56 AM2015-08-29T00:56:19+5:302015-08-29T00:56:19+5:30
यशाच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या ‘वेगाचा बादशाह’ उसेन बोल्ट याने नुकताच आगामी रिओ आॅलिम्पिकनंतर निवृत्ती घेण्याचे संकेत देत चाहत्यांन धक्का दिला.
बीजिंग : यशाच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या ‘वेगाचा बादशाह’ उसेन बोल्ट याने नुकताच आगामी रिओ आॅलिम्पिकनंतर निवृत्ती घेण्याचे संकेत देत चाहत्यांन धक्का दिला.
२०१७ साली लंडन येथे होणाऱ्या पुढील जागतिक अजिंक्यपद अॅथलेटीक्स स्पर्धेसाठी माझा सहभाग असेल की नाही याबाबत मी ठाम नाही. त्यामुळे मी कदाचीत रिओ आॅलिम्पिकनंतर निवृत्ती घेऊ शकतो, असे बोल्टने सांगितले. रिओ आॅलिम्पिकनंतर मी आणखी एक मोसम खेळावे अशी माझ्या प्रायोजकांची इच्छा आहे. मात्र लंडन जागतिक अजिंक्यपदासाठी ठाम नसशील तर सहभागी नको होऊ असा सल्ला प्रशिक्षकांनी दिला आहे, असेही बोल्ट म्हणाला.
त्याचवेळी सर्वकाही रिओ आॅलिम्पिकवर अवलंबून असेल असे सांगताना बोल्ट म्हणाला की, पुढील वर्षी होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेनंतर मी माझा निर्णय जाहीर करु शकतो. हे सर्व आॅलिम्पिक कामगिरीवर अवलंबून असेल. सध्या चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटीक्समध्ये बोल्टने १०० मीटर व २०० मीटर शर्यतीमध्ये सुवर्ण कमाई करुन डबल धमाका केला आहे. (वृत्तसंस्था)