फेडररकडून निवृत्तीचे संकेत
By admin | Published: January 31, 2017 04:38 AM2017-01-31T04:38:29+5:302017-01-31T04:38:29+5:30
पारंपरिक प्रतिस्पर्धी राफेल नदाल याला नमवताना आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या रॉजर फेडररने त्याच्या कारकिर्दीतील हा अखेरचा पल्ला असल्याचे संकेत दिले
मेलबर्न : पारंपरिक प्रतिस्पर्धी राफेल नदाल याला नमवताना आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या रॉजर फेडररने त्याच्या कारकिर्दीतील हा अखेरचा पल्ला असल्याचे संकेत दिले आहेत. स्वीत्झर्लंडच्या या ३५ वर्षीय दिग्गजाला पुढील वर्षी येथे परतण्याची खात्री नाही. फेडररने रविवारी राफेल नदालला ५
सेटमध्ये अंतिम फेरीत पराभूत करीत १८ वे ग्रँडस्लॅम एकेरीचे विजेतेपद जिंकले.
तो म्हणाला, ‘पुढील वर्षी भेटण्याची आशा आहे; परंतु जरी भेटू शकलो नाही तरी येथे या वर्षीची कामगिरी शानदार झाली आहे. मी खूप आनंदित आहे.’
इतक्या वर्षांपासून सुरू असलेल्या निवृत्तीविषयीचे युक्तिवाद फेटाळणाऱ्या फेडररने आता मात्र दुखापतीमुळे त्याला निवृत्ती घ्यावी लागू शकते, असे स्पष्ट केले आहे.
तो म्हणाला, ‘कदाचित मी दुखापतग्रस्त झालो अथवा पुढील वर्षी खेळू शकलो नाही, तर पुढे काय होईल हे कोणी जाणू शकत नाही.
पुढील ग्रँडस्लॅम केव्हा जिंकू अथवा नाही हेदेखील तुम्हाला माहीत नसते. ही माझी अखेरची आॅस्ट्रेलियन ओपन आहे याचा मी विचार केला नाही. मी पुन्हा येऊ शकेल, अशी आशा आहे; परंतु ही आशाच आहे.’