‘ताल स्मृती बुद्धिबळ २०१६ :विश्वनाथन आनंदचा दिमाखदार विजय

By admin | Published: September 29, 2016 11:08 AM2016-09-29T11:08:52+5:302016-09-29T11:49:21+5:30

मॉस्को, रशिया येथे खेळवल्या जाणाऱ्या ‘ताल स्मृती बुद्धिबळ २०१६’ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने शख्रीयर मामेद्यारोव वर विजय मिळवला

'Rhythm Memory Chess 2016: Viswanathan Anand's Blissful Victory | ‘ताल स्मृती बुद्धिबळ २०१६ :विश्वनाथन आनंदचा दिमाखदार विजय

‘ताल स्मृती बुद्धिबळ २०१६ :विश्वनाथन आनंदचा दिमाखदार विजय

Next
केदार लेले, ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २९ - मॉस्को, रशिया येथे खेळवल्या जाणाऱ्या ‘ताल स्मृती बुद्धिबळ २०१६’ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने शख्रीयर मामेद्यारोव वर विजय मिळवला. या स्पर्धेत आनंदचा हा पहिलाच विजय असून, पहिल्या डावात त्याला अनीष गिरी विरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. तसेच नेदरलँड्सच्या अनीष गिरी ने काळ्या मोहऱ्यांनी खेळतांना गेल्फंड वर आक्रमक विजय मिळवला. 
अनुक्रमे क्रॅमनिक आणि ली चाओ, टोमाशेवस्की आणि अरोनियन, स्विडलर आणि नेपोम्नियाची यांच्यातील लढती बरोबरीत सुटल्या.
 
विश्वनाथन आनंद विरुद्ध शख्रीयर मामेद्यारोव
रॉय लोपेझ पद्धतीने झालेल्या डावात मामेद्यारोव याने झेस्टव पद्धत अवलंबली. सध्या रॉय लोपेझ झेस्टव पध्दत प्रचलित नसल्यामुळे आनंदला त्याच्या स्मरणशक्तीवर अधिक भर द्यावा लागला. आनंदने 19व्या चालीवर अश्वाची (19 Ne3) नाविन्यपूर्ण चाल रचली.
 
आनंदच्या मतानुसार 23व्या चालीवर मामेद्यारोव याने (23 ...a4) रचलेल्या प्याद्याची कमकुवत चाल डावाचे चित्र बदलणारी ठरली. या चालीमुळे आनंदला वजिराच्या विभागातील डाव मोकळा करण्यासाठी नामी संधी चालून आली.
 
25व्या चालीवर आनंदने राजाकडील प्याद्याची (25 f4) चाल रचली. या चालीमुळे मामेद्यारोव वर दबाव वाढविण्यात आनंद यशस्वी झाला. या चाली नंतर मामेद्यारोव याला त्याच्या अश्वाचा बळी देणं अनिवार्य आहे असे दिसून आले! 
 
29व्या चालीवर मामेद्यारोव ने वजिरा-वजिरी करायची ठरवली. डावात वजिरा-वजिरी झाल्यानंतर मामेद्यारोव ला त्याच्या अश्वाचा बदल्यात तीन प्यादी मिळाली. डावामध्ये तणावपूर्ण परिस्थिती असतना देखील आनंदने अचूक चाली रचत डावावर चांगलीच पकड घेतली.
 
46व्या चालीवर आनंद मात करण्याचा सापळा रचण्यात यशस्वी झाला! अखेर हत्ती मारला जाईल आणि पराभव अटळ आहे हे लक्षात येताच मामेद्यारोव ने डाव सोडला. ५४ व्या चालीला त्याने शरणागती पत्करली व आनंदने पूर्ण गुण वसुल केला. 
 
दुसर्‍या फेरीअखेर गुणसंख्या
विश्वनाथन आनंद, अनिष गिरी,  नेपोम्नियाची – 1.5
स्विडलर, क्रॅमनिक, अरोनियन, ली चाओ – 1
गेल्फंड, मामेद्यारोव, टोमाशेवस्की - 0.5
 
अशी रंगेल तिसरी फेरी
ली चाओ वि. विश्वनाथन आनंद
नेपोम्नियाची वि. क्रॅमनिक
अरोनियन वि. स्विडलर
अनिष गिरी वि. टोमाशेवस्की
मामेद्यारोव वि. गेल्फंड

 विश्वनाथन आनंद विरुद्ध शख्रीयर मामेद्यारोव

1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 a6 4. Ba4 Nf6 5. O-O Be7 6. Re1 b5 7. Bb3 d6 8. c3 O-O 9. h3 Bb7 10. d4 Re8 11. Nbd2 exd4 12. cxd4 Nd7 13. Nf1 Na5 14. Bc2 Bf6 15. Rb1 c5 16. d5 Nc4 17. b3 Nce5 18. N3h2 Ng6 19. Ne3 Bc8 20. Bd2 b4 21. Nhg4 a5 22. Nxf6+ Qxf6 23. g3 a4 24. bxa4 Nde5 25. f4 Nxf4 26. gxf4 Qxf4 27. Nf1 Qh4 28. Re3 Bxh3 29. Qe2 Qg4+ 30. Qxg4 Bxg4 31. a3 Nf3+ 32. Kf2 Nd4 33. Rb2 bxa3 34. Rxa3 Nxc2 35. Rxc2 Rxe4 36. a5 Bc8 37. Re3 Rf4+ 38. Rf3 Re4 39. Rb2 Ba6 40. Bc3 h5 41. Ng3 Rh4 42. Rb6 Rh2+ 43. Kg1 Rc2 44. Nf5 Bc4 45. Re3 Kh7 46. Rxd6! Rb8 47. Rb6 Rxb6 48. axb6 Bxd5 49. Nxg7 Rg2+ 50. Kf1 Rg6 51. Nxh5 Bc4+ 52. Kf2 Rxb6 53. Nf6+ Kh6 54. Rg3 1-0

Web Title: 'Rhythm Memory Chess 2016: Viswanathan Anand's Blissful Victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.