दुष्काळाविषयी योग्य निर्णय देण्यात येईल : विराट कोहली

By admin | Published: April 12, 2016 03:39 AM2016-04-12T03:39:59+5:302016-04-12T03:39:59+5:30

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यावरून वाद सुरू असताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही

The right decision about drought will be given: Virat Kohli | दुष्काळाविषयी योग्य निर्णय देण्यात येईल : विराट कोहली

दुष्काळाविषयी योग्य निर्णय देण्यात येईल : विराट कोहली

Next

बंगळुरू : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यावरून वाद सुरू असताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही आपली प्रतिक्रिया दिली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा असून, या प्रकरणातील दोन संबंधित पक्ष संमजसपणे मार्ग काढतील, असे मत कोहलीने व्यक्त केले.
कोहलीने यासंबंधी सांगितले, ‘‘जर यातून मार्ग काढण्यात आला, तर मला विश्वास आहे, की दोन्ही संबंधित पक्ष यातून पुढे जाण्याचा मार्ग काढतील. शिवाय, दोन्ही पक्ष दोन्ही बाजूंचा विचार करून सर्वश्रेष्ठ निर्णय घेतील.’’ त्याचप्रमाणे, ‘‘सध्या तरी ज्याप्रकारे आपल्याला चित्र दिसतेय, तीच परिस्थिती आहे. त्यामुळेच मलाही अंतिम निर्णयाची उत्सुकता लागली आहे,’’ असेही कोहलीने सांगितले.
आयपीएलदरम्यान खेळपट्टीवर पाणी वापरण्यात येत असल्याच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या जनहित याचिकेनंतर महाराष्ट्रातील आयपीएल आयोजनावरून वाद निर्माण झाला होता. शिवाय, नुकतीच कर्नाटक
उच्च न्यायालयातही याच प्रकारची याचिका एका पर्यावरण कार्यकर्त्याने सादर केली.
याबाबतही कोहलीने निश्चितच सर्वोत्तम पद्धतीने हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे सांगितले. याविषयी कोहली वैयक्तिक मत देताना म्हणाला, ‘‘याप्रकरणी माझे मत महत्त्वाचे आहे, असे मला वाटत नाही. हे प्रकरण सोडवणे अधिकारी व
उच्च पदावर बसलेल्यांवर
अवलंबून आहे. ते नक्कीच यामध्ये योग्य निर्णय देतील.’’ (वृत्तसंस्था)

राजकोटमधील आयपीएल
सामन्याला भाजपाच्या माजी खासदारांचा विरोध
राजकोट : भाजपाचे माजी खासदार सिद्धार्थ परमार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय दलित महासंघाच्या सदस्यांनी शहर आणि गुजरातच्या अन्य भागातील पाण्याची तीव्र टंचाई पाहता कांधेरी स्टेडियममध्ये होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या आयोजनाला विरोध करताना येथे धरणे आंदोलन केले़ परमार आणि त्यांच्या समर्थकांनी येथे सिव्हिल हॉस्पिटल सर्कलवर आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बसून धरणे आंदोलन केले़

Web Title: The right decision about drought will be given: Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.