‘निवृत्तीचा निर्णय हा धोनीचा अधिकार’

By admin | Published: February 6, 2016 03:14 AM2016-02-06T03:14:27+5:302016-02-06T03:14:27+5:30

कुणी कधी निवृत्त व्हावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. बोर्ड आणि निवडकर्ते कुणाला याबाबत निर्देश देऊ शकत नाही. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला कधी निवृत्त व्हायचेय हा निर्णय त्याने स्वत: घ्यावा.

'Right to retire Dhoni's right' | ‘निवृत्तीचा निर्णय हा धोनीचा अधिकार’

‘निवृत्तीचा निर्णय हा धोनीचा अधिकार’

Next

नवी दिल्ली : कुणी कधी निवृत्त व्हावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. बोर्ड आणि निवडकर्ते कुणाला याबाबत निर्देश देऊ शकत नाही. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला कधी निवृत्त व्हायचेय हा निर्णय त्याने स्वत: घ्यावा. किंबहुना हा त्याचा अधिकार आहे असे राष्ट्रीय निवड समिती प्रमुख संदीप पाटील यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड केल्यानंतर धोनीच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत पाटील म्हणाले,‘आम्हाला माहीच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असून संघ निवडताना त्याच्या सूचना ध्यानात घेण्यात येतात.’ हा विश्वचषक धोनीसाठी अखेरचा असू शकतो का, या प्रश्नाच्या उत्तरात पाटील म्हणाले,‘खेळाडूंना निवृत्त होण्याच्या सूचना देण्याचा बीसीसीआय तसेच निवड समितीला कुठलाही अधिकार नाही. खेळाडूने कधी निवृत्त व्हावे हे त्यालाच ठरवायचे असते. आम्हाला माहीच्या नेतृत्वावर विश्वास आहे. विश्वचषकात संघाचे नेतृत्व करण्यात तो सर्वांत योग्य व्यक्ती आहे.

Web Title: 'Right to retire Dhoni's right'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.