रिओ ऑलिम्पिक : तीन दिवसात ४ लाख ५० हजार कंडोमचे वाटप

By Admin | Published: August 9, 2016 09:51 AM2016-08-09T09:51:33+5:302016-08-09T12:18:23+5:30

रियो आॅलिम्पिकमध्ये अवघ्या ३ दिवसात एका नवीन विक्रमाची नोंद झाली आहे. गेम्स व्हिलेजमध्ये ४ लाक ५० हजार कंडोम वाटले गेले आहेत.

Rio Olympics: 4,50,000 condoms distributed in three days | रिओ ऑलिम्पिक : तीन दिवसात ४ लाख ५० हजार कंडोमचे वाटप

रिओ ऑलिम्पिक : तीन दिवसात ४ लाख ५० हजार कंडोमचे वाटप

googlenewsNext
>शिवाजी गोरे 
रिओ दि जानेरो, दि. ९ - आॅलिम्पिक स्पर्धेत विविध विक्रमांची नोंद होत असते. त्यातच रियो आॅलिम्पिकमध्ये अवघ्या तीन दिवसात एका नवीन विक्रमाची नोंद झाली आहे. गेम्स व्हिलेजमद्ये ४ लाक ५० हजार कंडोम वाटले गेले आहेत. जगातील विविध स्पर्धांच्या वेळी किती कंडोम वाटले जाता याचा सर्व्हे करणारे  लंडन येथिल क्वीन मेरी विद्यापीठाचे स्पोट्स मेडिसिनचे प्राध्यापक निकोला मालफुल्ली  यांनी सांगितले. 
निकोला म्हणाले, पहिल्या तीन दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम वाटप होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अथेन्स, बीजिंग आणि लंडन आॅलिम्पिक स्पर्धेत मी वैद्यकिय अधिकारी म्हणून काम केले आहे. पण त्या तिन्ही वेळेस एवढ्या मोठ्या  प्रमाणात मागणी झाली नव्हती. या स्पर्धेत  अशीच जर मागणी राहिली तर कंडोमचा तुटवडा नक्कीच भासणार आहे. त्यांनी असेही सांगितले की, वैद्यकीय शास्त्रनुसार जर खेळाडूने सामन्याच्या आधी कोणत्याही पुरूष व महिला खेळाडूने सेक्स केले तर दोघांच्याही कामगिरीवर चांगला परिणार होतो. त्याच्या कॅलेरीज सुध्दा वाढतात. अनेक प्रकारच्या खेळांचे खेळाडू कंडोमचा  उपयोग करतात. क्रीडा क्षेत्रात सेक्स करणे हे उत्तेजक प्रकारात येत नाही. त्यामुळे खेळाडू कंडोमचा जास्त उपयोग करतात. आॅलिम्पिक स्पर्धेत कंडोम वाटण्याची प्रथा १९८८ मध्ये  सोऊल येथून झाली. 
निकोला शेवटी म्हणाले, नागरिक या गोेष्टीकडे वेगळ्या नजरेने पहातात. पण सध्याच्या काळात याची जास्त आवश्यकता आहे. स्पर्धेच्या काळात खेळाडूंनी सेक्स करणे काहीच गैर नाही. लंडन, अमेरीका, युरोप, ग्रीस, पोर्तुगाल, इटली येथिल खेळाडू स्पर्धेच्या पूर्वी एकदा करी सेक्स करतात. हे त्याचे व्यवस्थापक आणि मार्गदर्शकांना सुध्दा माहित असते. पुढे असे व्हयला नको की हा प्रकार सुध्दा उत्तेजक म्हणून बंद व्हावा. कारण आपण क्रीडा क्षेत्रात उत्तेजन द्रव्य सेवन असे म्हणतो. याचा अर्थ असा कि त्या खेळाडूने त्याच्या कामगिरीत सुधारणा व्हावी यासाठी गोळ्या किंवा इंजेक्शन घेतले असेल, मग सेक्समुळे सुध्दा खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा होते. म्हणून सेक्स बंद करायचे!.  
 

Web Title: Rio Olympics: 4,50,000 condoms distributed in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.