रिओ ऑलिम्पिक : बोल्टची 'सुवर्ण' हॅटट्रिक
By admin | Published: August 15, 2016 07:49 AM2016-08-15T07:49:23+5:302016-08-15T07:50:40+5:30
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या रिओ ऑलिम्पिकमधील पुरूषांच्या १०० शंभर मीटर शर्यतीत 'वेगाचा बादशहा' अशी ओळख असलेला जमैकाचा स्टार खेळाडू उसेन बोल्टने 'सुवर्ण'पदकाची हॅटट्रिक पूर्ण केली.
Next
ऑनलाइन लोकमत
रिओ दि जानेरो, दि. १५ - संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या पुरूषांच्या १०० शंभर मीटर शर्यतीत 'वेगाचा बादशहा' अशी ओळख असलेला जमैकाचा स्टार खेळाडू उसेन बोल्टने यंदाही निर्विवाद वर्चस्व गाजवत ऑलिम्पिकमध्ये 'सुवर्ण'पदकाची हॅटट्रिक पूर्ण केली. ऑलिम्पिक स्पर्धेतील बोल्टचे हे सातवे पदक आहे. बोल्टने ही शर्यत 9.81 सेकंदांत पूर्ण करत सुवर्णपदाकवर आपले नाव कोरले
बोल्टला या शर्यतीत त्याचे प्रमुख प्रतिस्पर्धी अमेरिकेचा जस्टीन गॅटलीन, माजी विश्वविजेता योहान ब्लेक यांच्यासह अमेरिकेचा ट्रायव्हन ब्रोमेल, कॅनडाचा आंद्रे दी ग्रेस, माजी विश्वविजेता सेंट किट्सचा किम कॉलीन्स या प्रमुख धावपटूंचे आव्हान होते. पण, बोल्टने पुन्हा एकदा आपणच जगातील वेगवान धावपटू असल्याचे सिद्ध केले. जस्टिन गॅटलीनने 9.89 सेकंदांसह रौप्य आणि आंद्रे दी ग्रेसने ब्राँझपदक मिळविले. यापूर्वी 100 मीटरमध्ये अमेरिकेच्या आर्ची हान (1904 व 1908) आणि कार्ल लुईस (84 व 88) यांना सलग सुवर्णपदक मिळवता आले होते.
Usain Bolt wins the men’s 100m #Gold medal for the third straight time at the #OlympicGames!! #Athletics@usainboltpic.twitter.com/JCE548gZFk
— Rio 2016 (@Rio2016_en) August 15, 2016
With his golden 100m victory of (9.81s), Usain Bolt completes the first part of his ‘triple-triple’ bid at #Rio2016pic.twitter.com/AiYqlAwdSH
— Rio 2016 (@Rio2016_en) August 15, 2016