रिओ आॅलिम्पिक : आयओसीला लाच देऊन खरेदी केले यजमानपद,ब्राझील पोलिसांचा खळबळजनक खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:34 AM2017-09-07T00:34:33+5:302017-09-07T00:35:10+5:30
आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीला (आयओसी) लाच देऊन रिओ आॅलिम्पिकचे यजमानपद खरेदी करण्याचा कट देशाच्या आॅलिम्पिकप्रमुखांनी रचल्याचा खळबळजनक खुलासा ब्राझील पोलिसांनी केला आहे.
रिओ : आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीला (आयओसी) लाच देऊन रिओ आॅलिम्पिकचे यजमानपद खरेदी करण्याचा कट देशाच्या आॅलिम्पिकप्रमुखांनी रचल्याचा खळबळजनक खुलासा ब्राझील पोलिसांनी केला आहे.
२०१६ च्या आॅलिम्पिकचे यजमानपद रिओकडे सोपविण्याच्या बदल्यात मते खरेदी करण्यासाठी जी लाच देण्यात आली त्या आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचाराचा तपास करीत असल्याचे ब्राझील पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा सांगितले. यासंदर्भात अनेक देशांमध्ये गेले नऊ महिने तपास करण्यात आला. त्यातून काही गडबड असल्याचे निष्पन्न होत आहे. ब्राझीलच्या आॅलिम्पिक संघटनेचे प्रमुख कार्लोस नुजमॅन यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असून त्यांच्या निवासस्थानाचीदेखील झडती घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. नुजमॅन यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी अद्याप त्यांना औपचारिक अटक झालेली नाही. त्यांचा पासपोर्टदेखील जप्त करण्यात आला. याशिवाय एक व्यापारी आर्थर सोरेस याच्या अटकेचे वॉरंट काढण्यात आले आहेत. याच व्यापाºयाला रिओ सरकारने आॅलिम्पिक आयोजनातील मोठ्या रकमेचे ठेके दिले होते. या व्यापाºयाची माजी सहकारी असलेली एलियेने कावालकेंटे या महिलेलादेखील रिओ येथे अटक करण्यात आली आहे. स्वित्झर्लंडच्या लुसाने शहरात असलेल्या आयओसी मुख्यालयाच्या एका प्रवक्त्याने या प्रकारावर आश्चर्य व्यक्त करताना सांगितले, ‘आयओसीला मीडियाद्वारे या प्रकाराची माहिती मिळाली. आम्ही सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.’ (वृत्तसंस्था)