रिओ ऑलिम्पिक : भारत १२ ते १५ पदक जिंकेल...
By admin | Published: July 11, 2016 05:54 PM2016-07-11T17:54:09+5:302016-07-11T17:54:09+5:30
बॅडमिंटन स्टार फुलराणी सायना नेहवाल, नेमबाज जीतू राय आणि कुश्तीपटूंना पदकांचे प्रबळ दावेदार म्हणून ठरवताना
Next
>नवी मुंबई : बॅडमिंटन स्टार फुलराणी सायना नेहवाल, नेमबाज जीतू राय आणि कुश्तीपटूंना पदकांचे प्रबळ दावेदार म्हणून ठरवताना, भारतीय ओलिम्पिक संघटनेने (आयओए) रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू १२ ते १५ पदक जिंकतील असा विश्वास व्यक्त केला. गतस्पर्धेच्या तुलनेत दुप्पट पदकं जिंकण्यात भारताला यश येईल, असे आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितले.
एका कार्यक्रमामध्ये बोलताना मेहता म्हणाले की, यंदाच्या स्पर्धेत भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत असून, आम्हाला विश्वास आहे की, भारतीय खेळाडू यावेळी १२ ते १५ पदकं जिंकण्यात यशस्वी होतील. तसेच, आम्हाला प्रत्येक खेळाडूकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असून सायना, जीतू, विकास कृष्णन, टेनिसमध्ये दुहेरी जोडी, तिरंदाजी, कुश्ती आणि हॉकी संघाकडून विशेष आशा आहे, असेही मेहता यांनी सांगितले.
त्याचवेळी, ऑलिम्पिकमधील भारतीय संघाचे प्रमुख राकेश गुप्ता यांनी मात्र सावध भूमिका घेताना सांगितले की, यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये १५ पदक मिळवण्याबाबत ठामपणे सांगता येणार नाही, परंतु एक मात्र नक्की की यावेळी भारताला गतआॅलिम्पिकच्या तुलनेत अधिक पदक मिळतील.ह्णह्ण २०१२ साली झालेल्या आॅलिम्पिकमध्ये भारताने एकूण ६ पदक जिंकले होते.
मिशन ऑलिम्पिकच्या एका अहवालानुसार भारताला यावेळी २० पदकांची आशा आहे. याबाबत विचारले असता गुप्ता यांनी सांगितले की, ह्यह्यमी अजून हा अहवाल पाहिला नसून हा अहवाल बघितल्याशिवाय कोणतीही टिप्पणी करणे अयोग्य ठरेल. आम्ही १५ पदकांची शाश्वती नाही देऊ शकत, मात्र गतस्पर्धेच्या तुलनेत यावेळी नक्कीच अधिक पदक जिंकू.ह्णह्ण
सध्या संघटनेच्या वादामुळे चर्चेत असलेल्या बॉक्सिंग खेळाबाबत गुप्ता यांनी म्हटले की, ह्यह्यराष्ट्रीय संघटना नसल्याने भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी कमी मिळाली. तरीही, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.