रिओ ऑलिम्पिक - भारताची बेल्जियमविरूध्द काट्याची टक्कर
By admin | Published: August 13, 2016 08:51 PM2016-08-13T20:51:40+5:302016-08-13T20:51:40+5:30
दोन विजय, दोन पराभव आणि एक बरोबरी साधत भारतीय पुरूष हॉकी संघाने या स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे
Next
>- शिवाजी गोरे
हॉकी : -उपांत्यफेरीसाठी टिम इंडियाला विजय आवश्यक
रिओ दी जानेरो, दि. 13 - दोन विजय, दोन पराभव आणि एक बरोबरी साधत भारतीय पुरूष हॉकी संघाने या स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बारीक सारीक चुकांमध्ये सुधारणा करून भारतीय पुरूष हॉकी संघाला उपांत्यफेरीतील आपली जागा निश्चित करण्यासाठी बेल्जियमविरूध्द आपला सर्वोउत्कृष्ट खेळ करावा लागणार आहे. भारतीय संघाने ३६ वर्षानंतर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश कलेला आहे.
या ऑलिम्पिकमध्ये दोन गटात सहा संघामध्ये साखळी सामने खेळविले गेले. प्रत्येक गटातील पहिले चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र झाले. पूर्वी बारा संघांमध्ये दोन गट केले जायचे. त्यातील प्रत्येक गटातील दोन संघ उपांत्यफेरीत प्रवेश करीत होते. भारताने ३६ वर्षानंतर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश कलेला आहे.
श्रीजेशच्या अॅन्ड कंपनीला आता बेल्जियमचा अडथळा पार करायचा आहे. भारत आणि बेल्जियम यांच्यातील लढतींचा इतिहास पाहिला तर भारतीची बाजू वरचड आहे. लंडन येथे झालेल्या चॅम्पियन्स चॅलेंजर्स स्पर्धे भारताने बेल्जियमला पराभूत केले आहे. भारताने या स्पर्धेत एकूण ९ गोल केले असून त्यांनी ९ गोल स्विकारले आहेत. दुसरीकडे बेल्जियमने २१गोल केले आहेत आणि त्यांनी फक्त ५ गोल स्विकारले आहेत. आॅस्ट्रेलिया सारख्या बलढ्या संघाला सुधदा त्यांनी पराभूत केले आहे. त्यामुळे भारतीय संघाला एकही चूक महागात पडू शकते. त्याना योग्य रणनीती आखून नियोजनबध्द खेळ करावा लागणार आहे.
भारताच्या सरदारसिंग रूपिंदर सिंग व व्हि. आर. रघुनाथ,आकाशदिप सिंग यांच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. कॅनाडाविरूध्द खेळताना व्हि. सुनिल जख्मी झाला आहे. त्यामुळे तो बेल्जियमविरूध्द खेलू शकेल की नाही हे रविवारीच कळेल.