रिओ ऑलिम्पिक - ललिता बाबरची फायनलमध्ये धडक

By admin | Published: August 13, 2016 08:29 PM2016-08-13T20:29:00+5:302016-08-13T20:36:29+5:30

ललिता बाबरने 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी ललिता महाराष्ट्राची पहिलीच अॅथलीट ठरली आहे

Rio Olympics - Laitha Babar strikes in final | रिओ ऑलिम्पिक - ललिता बाबरची फायनलमध्ये धडक

रिओ ऑलिम्पिक - ललिता बाबरची फायनलमध्ये धडक

Next
>- ऑनलाइन लोकमत
रिओ दी जानेरो, दि. 13 - रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळण्याच्या आशा ललिला बाबरच्या रुपाने पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. ललिता बाबरने 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी ललिता महाराष्ट्राची पहिलीच अॅथलीट ठरली आहे. यासोबतच ललिताने राष्ट्रीय विक्रमदेखील रचला आहे.  
 
प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या शर्यतीत 9 मिनिटं आणि 19.76 सेकंदांची वेळ नोंदवून ललिता बाबरने नवा राष्ट्रीय विक्रम रचला आहे.  जगभरातल्या एकूण 52 धावपटूंमध्ये सातवं स्थान मिळवत ललिताने अंतिम फेरीतला प्रवेश निश्चित झाला. 15 ऑगस्टला अंतिम फेरी पार पडणार आहे. ललिता बाबर यावेळी पदक जिंकून ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा ठसा उमटवेल अशी सर्वांना आशा आहे.
 

Web Title: Rio Olympics - Laitha Babar strikes in final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.