रिओ ऑलिम्पिक : टेनिस - सानिया- रोहन उपांत्य फेरीत
By admin | Published: August 13, 2016 08:08 AM2016-08-13T08:08:01+5:302016-08-13T12:24:46+5:30
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व रोहन बोपण्णा यांनी रिओ ऑलिम्पिकमधील टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीतील उपांत्य फेरीत प्रवेश केला.
Next
शिवाजी गोरे
रिओ दि जानेरो, दि. १३ - भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व रोहन बोपण्णा यांनी रिओ ऑलिम्पिकमधील टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीतील उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सानिया-बोपण्णा जोडीने इंग्लंडचा अँडी मरे व हेदर वॉटसन यांचा उपांत्यपूर्व फेरीत ६-४, ६-४ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. त्यांच्या या यशामुळे टेनिसमध्ये भारताला पदक मिळण्याच्या आशा उंचावल्या आहेत. उपांत्यफेरीत सानिया-रोहन जोडीची लढत अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्स व राजीव रामविरूध्द होणार आहे.
तत्पूर्वी सानिया-बोपण्णाने ऑस्ट्रेलियाच्या सॅमंथा स्टोसूर व जॉन पियर्स या जोडीचा ७-५, ६-४ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर आजची लढत पहाण्यासाठी भारतीय क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती. संपूर्ण स्टेडियममध्ये कम आॅन सोनिया, कम आॅन -रोहन आशा घोषणा सुरू होत्या. आपल्या पाठिराख्यांचा जल्लोष सुरू असल्यामुळे त्याच्या खेळ सुध्दा उत्कृष्ट होत गेला.
पहिल्या सेटमध्ये सानियाने मरेचे रिटर्न चांगले घेतले. त्यामुळे त्याला प्लेसिंग करता येत नव्हते आणि त्याला चेंडू नेट जवळ टाकता सुध्दा आले नाहीत. पहिल्या सेटमध्ये सानिया-रोहन जोडीने मरे-हेदरची सर्व्हिस दोन वेळा ब्रेक केली तर त्यांनी भारतीय जोडीची सर्व्हिस एकदा ब्रेक केली. पहिला सेट सानिया-रोहनने ६-४ गुणांनी ३४ मिनिटात जिंकला. दुसºया सेटमध्ये सानिया-रोहनने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून केला. सानियाने काही जोरादार बॅक हॅन्ड शॉट मारले तर रोहनने नेट जवळ प्लेसिंग करत मरेचे फटके परतावून लावले. सानियाने मरेकडे चेंडू मारण्याचे टालल्यामुळे त्याला खेळायला जास्त संधी मिळाली नाही.
दुसºया सेटमध्ये भारतीय जोडी ग्रेट ब्रिटनच्या जोडीची सर्व्हिस एकदा ब्रेक केली. सानिया-रोहन जोडीने दुसरा सेट ३३ मिनिटात ६-४ गुणांनी जिंकत उपांत्यफेरीतील आपली जागा निश्चित केली. अॅन्डी मरे आणि हेदर वॉटसन जोडीला आजच्या सामन्यात त्याच्या नावाला साजेसा खेळ करता आला नाही.
भारतीय जोडीने विजय नोंदविल्यानंतर भारतीय प्रेक्षकांनी दोन्ही खळाडूंच्या नावाचा जयघोष कोर्ट डोक्यावर घेतले.
आम्ही नियोजन केल्या प्रमाणे खेळ केला. आमचा समन्वय सुध्दा चांगला साधला जात होता. अन्यथा समोर जोडी चांगली असली तर सेट व्हायला वेळ लागगतो पण, तसे झाले नाही. आम्ही ठरविले होते की मरेकडे चेंडू जास्त मारायचे नाही म्हणजे त्याला खेळायला वाव मिळणार नाही. आणि तसेच झाले आमचे नियोजन फायद्याचे ठरले. रोहनने मरेचे चांगले रिटर्न घतले. त्याने प्लेसिंग सुध्दा चांगले केले. व्हिनस आणि राजीवविरूध्द खेळताना सुध्दा आम्ही वेगळी रणनिती आखणार आहोत. व्हिनस अनुभवी खेळाडू आहे. पण आमचा सुध्दा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आम्ही विजयाच्या इराद्यानेच खेळू
- सानिया-रोहन
Sania Mirza-Rohan Bopanna beat Andy Murray-Heather Watson 6-4, 6-4 to enter mixed doubles semi finals #Rio2016
— ANI (@ANI_news) August 12, 2016