रिओ पॅरालिम्पिक स्पर्धा आजपासून
By admin | Published: September 7, 2016 03:36 AM2016-09-07T03:36:16+5:302016-09-07T03:36:16+5:30
रिओ पॅरालिम्पिकला आज बुधवारपासून सुरुवात होत आहे. १८ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत सुवर्णविजेत्या भारतीय खेळाडूला ७५ लाखांचा रोख पुरस्कार देण्यात येईल.
नवी दिल्ली : रिओ पॅरालिम्पिकला आज बुधवारपासून सुरुवात होत आहे. १८ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत सुवर्णविजेत्या भारतीय खेळाडूला ७५ लाखांचा रोख पुरस्कार देण्यात येईल. रौप्यविजेत्यास ५० आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूला ३० लाख दिले जातील, अशी घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी केली. आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या पदकविजेत्या सामान्य खेळाडूलादेखील इतक्याच रकमेचा पुरस्कार दिला जातो.
भारतीय पथकातील खेळाडू
अंकूर धामा (१५०० मीटर दौड), मारियप्पन टी (उंच उडी), वरुणसिंग भाटी (उंच उडी), शरद कुमार (उंच उडी), रामपाल चाहर (उंच उडी), सुंदरसिंग गुर्जर (भालाफेक), देवेंद्र झांझरिया (भालाफेक), ंिरकू (भालाफेक), संदीप (भालाफेक), नरेंद्र रणवीर (भालाफेक), अमित कुमार सरोहा (क्लब थ्रो, थाळीफेक), धरमबीर (क्लब थ्रो), दीपा मलिक (गोळाफेक) फरमान बाशा (पॉवरलिफ्टिंग), सुयश नारायण जाधव (जलतरण), नरेश कुमार शर्मा (नेमबाजी) आणि पूजा (तीरंदाजी).