रियो मशाल करणार २० हजार किमीचा प्रवास
By admin | Published: February 28, 2016 12:43 AM2016-02-28T00:43:28+5:302016-02-28T00:43:28+5:30
रियो आॅलिम्पिक २०१६ची उलटगणती आता सुरू झाली असून, या खेळाची मशाल यजमान देशांत ३२९ गावे व शहरांत पुढील ९५ दिवसांपर्यंत २० हजार किलोमीटरचा प्रवास
रियो डी जानेरो : रियो आॅलिम्पिक २०१६ची उलटगणती आता सुरू झाली असून, या खेळाची मशाल यजमान देशांत ३२९ गावे व शहरांत पुढील ९५ दिवसांपर्यंत २० हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. ही मशाल १२ हजार लोकांच्या हातातून जाताना संपूर्ण ब्राझीलमधील सर्व ५ विभागांच्या ३२९ गावे आणि शहरांत २० हजार किलोमीटर आणि १० हजार मैलांचा हवाई प्रवास करणार आहे.
यादरम्यान मशाल जवळपास १२ हजार लोकांच्या हातातून जाणार असून देशातील ९० टक्के जनसंख्येपर्यंत पोहोचल्यानंतर ९५ दिवसांच्या प्रवासानंतर ती ५ आॅगस्टला माराकाना स्टेडियममध्ये आॅलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात पोहोचेल. त्याचबरोबर, २०१६ आॅलिम्पिकचा श्रीगणेशा होणार आहे. आयोजकांनी रियो २०१६ आॅलिम्पिक खेळाच्या अधिकृत वेबसाईटद्वारे ही माहिती दिली.
आॅलिम्पिक मशाल रिलेद्वारे ब्राझीलची खरी झलक दाखविणे हा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. आॅलिम्पिकच्या परंपरेनुसार आॅलिम्पिक मशालीला २१ एप्रिलला आॅलिम्पियात प्रज्वलित केले जाईल.