राइजिंग पुणे सुपरजायंट्सचा नऊ गडी राखून विजय

By admin | Published: April 9, 2016 11:02 PM2016-04-09T23:02:03+5:302016-04-09T23:07:54+5:30

आयपीएलच्या नवव्या पर्वाला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखाली असलेल्या राइजिंग पुणे सुपरजायंट्सने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा

Rising Pune SuperJaunts won by nine wickets | राइजिंग पुणे सुपरजायंट्सचा नऊ गडी राखून विजय

राइजिंग पुणे सुपरजायंट्सचा नऊ गडी राखून विजय

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - आयपीएलच्या नवव्या पर्वाला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखाली असलेल्या राइजिंग पुणे सुपरजायंट्सने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा धोबीपछाड करत नऊ गडी राखून विजय मिऴविला.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिलेल्या १२२ धावांचा पाठलाग करताना राइजिंग पुणे सुपरजायंट्सने १४.४ षटकात एक बाद १२६ धावा केल्या. 
फलंदाज अजिंक्य रहाणेच्या आक्रमक खेळीमुऴे राइजिंग पुणे सुपरजायंट्सच्या धावसंख्येत भर पडली. या सामन्यात अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी करत ४२ चेंडूत तीन षटकार आणि सात चौकार लगावत नाबाद ६६ धावा केल्या. तर केपी पीटरसने नाबाद २१ धावा केल्या. प्लेसीस ३४ धावांवर बाद झाला, त्याला गोलंदाज हरभजन सिंगने बाद केले. 
सामन्याच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सचा संघ सुरुवातीलाच ढासळला. राइजिंग पुणे सुपरजायंट्सने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना रोखत ४० धावांत अर्धा संघ गारद केला होता. मुंबई इंडियन्स १०० धावा तरी पुर्ण करेल की नाही अशी शंका होती. मात्र हरभजन सिंगने तुफान फटकेबाजी करत संघाला सावरलं आणि संघाचं शतकही पुर्ण केलं. हरभजन सिंगने ३० चेंडूत ४५ धावा केल्या तर अंबाती रायडूने २२ धावा केल्या. खालच्या फळीतील खेळाडूंनी संयमी खेळी खेळल्याने पहिल्याच सामन्यात ऑल आऊट होण्यापासून संघ वाचला. मुंबई इंडियन्सने ८ विकेट गमावत १२१ धावा केल्या आहेत. 
गोलंदाज इशांत शर्मा आणि मिशेल मार्शने प्रत्येकी २ विकेट्स घेतले तर बाकीच्या गोलंदाजांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 
 

Web Title: Rising Pune SuperJaunts won by nine wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.