रायझिंग पुणे सुपरजायंटचं मुंबई इंडियन्ससमोर 160 धावांचं लक्ष्य
By admin | Published: May 1, 2016 09:53 PM2016-05-01T21:53:21+5:302016-05-01T21:53:21+5:30
रायझिंग पुणे सुपरजाएंटनं 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा केल्या आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 1- आयपीएलच्या 9व्या पर्वात रायझिंग पुणे सुपरजायंटनं मुंबई इंडियन्ससमोर 160 धावांचं टार्गेट ठेवलं आहे. रायझिंग पुणे सुपरजाएंटनं 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सनं टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. कॅप्टन धोनीच्या नेतृत्वाखाली तिवारीनं 45 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकार खेचत 57 धावा केल्या आहेत. तर स्मिथनं 23 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकार लगावत लक्षणीय अशा 45 धावा केल्या आहेत.कॅप्टन कूल धोनीनंही 24 चेंडूंत 2 चौकार मारत 24 धावा केल्यात आहेत.
रहाणे 4, हँडस्कॉम्ब 6, पेरेरा*12, भाटिया* 3 धावा खेचल्या आहेत. रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी मुंबई इंडियन्सवर विजय मिळवणं गरजेचं आहे. धोनी ब्रिगेडनं दिलेलं 159 धावांचं टार्गेट मोडून काढणं रोहित शर्मा टीमसाठी आवश्यक आहे.