प्रतिस्पर्धी माझ्यावर जळतात : पेस

By admin | Published: September 19, 2016 10:30 PM2016-09-19T22:30:40+5:302016-09-19T22:30:40+5:30

माझे प्रतिस्पर्धी खेळाडू माझ्यावर जळतात, माझी प्रतिमा खराब करण्याचे एकमेव काम ते करीत आहेत, अशा शब्दात भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेसने जोरदार हल्ला चढविला आहे

The rivals burn me: Paes | प्रतिस्पर्धी माझ्यावर जळतात : पेस

प्रतिस्पर्धी माझ्यावर जळतात : पेस

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १९ : माझे प्रतिस्पर्धी खेळाडू माझ्यावर जळतात, माझी प्रतिमा खराब करण्याचे एकमेव काम ते करीत आहेत, अशा शब्दात भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेसने जोरदार हल्ला चढविला आहे. पेसने टेनिस क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले आहे, पण त्याबरोबरच वादविवादही त्याची पाठ सोडत नाहीत. आॅलिम्पिक असो, आशियाई स्पर्धा असो किंवा डेव्हीस कप असो, कोणत्याही मोठ्या स्पर्धेत पेस खेळत असला तरी वादविवाद त्याच्याशी पाठशिवणीचा खेळ खेळत असतो.

पेसने म्हंटले आहे की, लोक माझ्याविषयी काय बोलतात याचा त्याला काही फरक पडत नाही, तो इतिहास घडवण्यात व्यस्त आहे. डेव्हीस कपनंतर वृत्तसंस्थेशी त्याने काल रविवारी दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे की, कारकिर्दीच्या या वळणावर बहुतांश प्रतिस्पर्धी खेळाडू माझ्यावर जळत आहेत. १८ ग्रँडस्लॅम जिंकणे आणि सात आॅलिम्पिक स्पर्धा खेळण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात हे त्यांना माहित नाही.

काही खेळाडूंनी जरी दहावेळा जन्म घेतला तरी त्यांना हे शक्य नाही. या ठिकाणावर पोहचण्यासाठी कष्ट करण्याऐवजी ते मला येथून खाली खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. पडद्याआड चाली रचून माझ्या प्रतिमेला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आयुष्य खर्च करावे लागते, आणि ती घालण्यासाठी एका सेकंदाचा वेळ पुरेसा असतो. जे माझ्याविषयी भुंकतात त्यांची मी काळजी करीत नाही. मी टेनिस कोर्टवर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत असतो.

पेस म्हणतो...
माझ्यावर टीका करुन काही लोकांना प्रसिध्दी मिळवायची आहे. जोपर्यत मी ग्रँडस्लॅम जिंकत आहे, तो पर्यंत खेळत राहणार
लोकांच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष करुन मी माझी चाल चालणार आहे. लोक तुमच्या शांत स्वभावाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात

Web Title: The rivals burn me: Paes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.