Ballon d’Or 2024: फुटबॉल जगतातील मानाचा पुरस्कार जिंकत Rodri नं रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 10:07 AM2024-10-29T10:07:21+5:302024-10-29T10:13:01+5:30

या पुरस्कारासाठी रिअल मॅड्रिडकडून खेळणारा  ब्राझीलचा विनिसियस ज्युनिअर आणि इंग्लंडचा जूड बेलिंगहॅम हे खेळाडूही शर्यतीत होते. त्यांना मागे टाकत रॉड्रीनं बाजी मारली. 

Rodri wins Ballon d’Or 2024, becomes first Manchester City player to do so | Ballon d’Or 2024: फुटबॉल जगतातील मानाचा पुरस्कार जिंकत Rodri नं रचला इतिहास

Ballon d’Or 2024: फुटबॉल जगतातील मानाचा पुरस्कार जिंकत Rodri नं रचला इतिहास

Rodri wins Ballon d’Or 2024 : स्पेन आणि मँचेस्टर सिटीचा मिडफील्डर रोड्री याने फुटबॉल जगतातील सर्वोत्तम खेळाडूला दिला जाणारा प्रतिष्ठित  बॅलोन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे. या पुरस्कारासाठी रिअल मॅड्रिडकडून खेळणारा  ब्राझीलचा विनिसियस ज्युनिअर आणि इंग्लंडचा जूड बेलिंगहॅम हे खेळाडूही शर्यतीत होते. त्यांना मागे टाकत रॉड्रीनं बाजी मारली. 

मानाचा पुरस्कार जिंकणारा मँचेस्टरचा पहिला खेळाडू ठरला रोड्री 

फुटबॉल जगतातील मानाचा पुरस्कार पटकावणाऱ्या रॉड्री याने मागच्या हंगामात आपल्या संघाला सलग चौथ्यांदा प्रीमियर लीग ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.  स्पेनच्या संघानं विक्रमी जेतेपद मिळवल्यानंतर यावर्षीच्या युरोपीय चॅम्पियनशिपमध्ये तो सर्वोत्तम खेळाडूही ठरला होता. बॅलोन डी'ओर पुरस्कार जिंकणारा मँचेस्टर सिटीचा तो पहिला खेळाडू आहे.

६४ वर्षांनी स्पॅनिश खेळाडूनं जिंकला हा पुरस्कार
 
स्पेनच्या संघानं २०१० मध्ये वर्ल्ड कप स्पर्धा आणि २००८, २०१२ मध्ये युरो कप स्पर्धा जिंकली. पण मागील ६४ वर्षांत एकाही स्पॅनिश खेळाडूला हा पुरस्कार जिंकता आला नव्हता. १९६० नंतर पहिल्यांदा स्पॅनिश खेळाडूनं बॅलोन डी'ओर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. याआधी लुइस सुआरेझ या दिग्गजाने हा मानाचा पुरस्कार पटकावला होता. त्यावेळी तो बार्सिलोनाकडून खेळायचा.  रिअल मॅड्रिडसाठी दिग्गज अल्फ्रेडो स्टेफानो डी स्टेफानो यांनी १९५७ आणि १९५९ मध्ये दोन वेळा हा पुरस्कार पटकावला होता.  

बॅलन डी'ओर २०२४ पुरस्कार विजेत्यांची यादी 

  • बॅलन डी'ओर: रोड्री
  • बॅलन डी'ओर फेमिनिन: ऐताना बोनमती
  • कोपा ट्रॉफी: लामिन यामल
  • पुरुष कोच ऑफ द ईयर: कार्लो एंसेलोटी  
  • महिला कोच ऑफ द ईयर: एम्मा हेस
  • याशिन ट्रॉफी: एमिलियानो मार्टिनेज
  • पुरुष क्लब ऑफ द ईयर: रियल मॅड्रिड
  • महिला क्लब ऑफ द ईयर: बार्सिलोना
  • गर्ड मुलर ट्रॉफी: हॅरी केन आणि किलियन एम्बापे

Web Title: Rodri wins Ballon d’Or 2024, becomes first Manchester City player to do so

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.