दहा हजार मीटर दौडीत रोहिणीला विक्रमी रौप्य अ.भा. आंतर विद्यापीठ ॲथ्लेटिक्स

By admin | Published: January 3, 2016 12:05 AM2016-01-03T00:05:02+5:302016-01-03T00:05:02+5:30

नागपूर : रातुम नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारी आंतरराष्ट्रीय धावपटू रोहिणी राऊत हिने पतियाळा येथे शनिवारी अ.भा. आंतर विद्यापीठ ॲथ्लेटिक्स स्पर्धेत दहा हजार मीटर दौडीत नव्या विक्रमासह रौप्य पदक जिंकले. गतवर्षी तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या रोहिणीने आज ३४ मिनिटे ५८.२७ सेकंदांचा स्पर्धा विक्रम मोडित काढताना ३४ मिनिटे ४२.४३ सेकंदांची वेळ नोंदविली.

Rohini's record silver in 10 thousand meter race Inter-University Athletics | दहा हजार मीटर दौडीत रोहिणीला विक्रमी रौप्य अ.भा. आंतर विद्यापीठ ॲथ्लेटिक्स

दहा हजार मीटर दौडीत रोहिणीला विक्रमी रौप्य अ.भा. आंतर विद्यापीठ ॲथ्लेटिक्स

Next
गपूर : रातुम नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारी आंतरराष्ट्रीय धावपटू रोहिणी राऊत हिने पतियाळा येथे शनिवारी अ.भा. आंतर विद्यापीठ ॲथ्लेटिक्स स्पर्धेत दहा हजार मीटर दौडीत नव्या विक्रमासह रौप्य पदक जिंकले. गतवर्षी तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या रोहिणीने आज ३४ मिनिटे ५८.२७ सेकंदांचा स्पर्धा विक्रम मोडित काढताना ३४ मिनिटे ४२.४३ सेकंदांची वेळ नोंदविली.
तायवाडे कॉलेज कोराडी येथील विद्यार्थिनी असलेल्या रोहिणीने अम्मान, बहरिन, मलेशिया येथे आशियाई ॲथ्लेटिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत पदके जिंकली आहेत. पुण्यात ९ आणि १० जानेवारीला होणाऱ्या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत ती महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे. आज रविवारी रोहिणी अर्ध मॅरेथान शर्यतीत सहभागी होईल. रातुम नागपूर विद्यापीठााच खेळाडू असलेला जगतारसिंग याला डेथॉलनमध्ये कांस्य पदक मिळाल्याची माहिती जिल्हा ॲथ्लेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी यांनी एका पत्रकाद्वारे दिली.(क्रीडा प्रतिनिधी)
..................................................................

Web Title: Rohini's record silver in 10 thousand meter race Inter-University Athletics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.