रोहित शर्मा, पार्थिव पटेल कर्णधार
By Admin | Published: March 22, 2017 12:18 AM2017-03-22T00:18:52+5:302017-03-22T00:18:52+5:30
देवधर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी रोहित शर्मा आणि पार्थिव पटेल यांना अनुक्रमे इंडिया ब्ल्यू आणि इंडिया रेड या संघांच्या कर्णधारपदी नियुकत
नवी दिल्ली : देवधर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी रोहित शर्मा आणि पार्थिव पटेल यांना अनुक्रमे इंडिया ब्ल्यू आणि इंडिया रेड या संघांच्या कर्णधारपदी नियुकत करण्यात आले आहे. विजय हजारे चषक स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळे हरभजन सिंग याला २८ खेळाडंूच्या यादीत स्थान मिळाले आहे.
महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर सुरेश रैनाचा यादीत समावेश नाही. त्यामुळे रैनाच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या स्पर्धेत विजय हजारे चषक विजेता तमिळनाडू हा तिसरा संघ असणार आहे. पार्थिव रेड संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक असेल, तर रिषभ पंत ब्ल्यू संघाचा यष्टीरक्षक असेल.
हरभजनने मुश्ताक अली चषक आणि हजारे चषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे त्याला देवधर ट्रॉफीसाठी निवडण्यात आले आहे. याचा अर्थ असाही होतो की, इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याच्या नावावर गांभिर्याने विचार केला जाऊ शकतो.
संघ असे आहेत :-
इंडिया ब्लू : रोहित शर्मा (कर्णधार), मनदीप सिंह, श्रेयस अय्यर, अंबाती रायुडु, मनोज तिवारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, हरभजन सिंह, कृणाल पंड्या, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, शार्दुल ठाकुर, प्रसिद्ध कृष्णा आणि पंकज राव.
इंडिया रेड : पार्थिव पटेल (कर्णधार व यष्टीरक्षक), शिखर धवन, मनीष पांडे, मयंक अग्रवाल, केदार जाधव, इशांक जग्गी, गुरकीरत मान, अक्षर पटेल, अक्षय कर्णीवार, अशोक डिंडा, कुलवंत खजूरिया, धवल कुलकर्णी आणि गोविंदा पोद्दार.