रोहित शर्मा डिसेंबरमध्ये अडकणार लग्नबंधनात

By Admin | Published: October 30, 2015 10:14 AM2015-10-30T10:14:20+5:302015-10-30T10:16:52+5:30

भारताचा शानदार फलंदाज रोहित शर्माही लग्नाच्या बेडीत अडकण्यास सज्ज झाला असून तो रितिकासोबत येत्या १३ डिसेंबरला विवाहबद्ध होणार आहे.

Rohit Sharma will be arrested in December | रोहित शर्मा डिसेंबरमध्ये अडकणार लग्नबंधनात

रोहित शर्मा डिसेंबरमध्ये अडकणार लग्नबंधनात

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - भारतीय क्रिकेट संघात सध्या लग्नाचे वारे वाहू लागले आहेत, फिरकीपटू हरभजन सिंग अभिनेत्री गीता बसरासोबत नुकताच लग्नबंधनात अडकलेला असताना आता भारताचा शानदार फलंदाज रोहित शर्माही लग्नाच्या बेडीत अडकण्यास सज्ज झाला आहे. रोहित आणि रितिका येत्या १३ डिसेंबरला विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
हा एक चांगला मुहूर्त असून विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ७ डिसेंबरलाच संपणार असल्याने त्यानंतर रोहित कोणत्याही क्रिकेट सामन्यांमध्ये व्यस्त नसेल, अशी माहिती रोहितच्या एका जवळच्या मित्राने दिली आहे.
मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा विवाह समारंभ पार पडणार, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह भारतीय संघातील आजी - माजी खेळाडू या लग्नाला उपस्थित राहणार असल्याचे समजते. 
रितिका ही रोहितची मॅनेजर असून एकत्र काम करतानाच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एप्रिलमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला होता. 

Web Title: Rohit Sharma will be arrested in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.