रोहित, विराटची अर्धशतके, भारताचे ऑस्ट्रेलियासमोर १८५ धावांचे लक्ष्य
By admin | Published: January 29, 2016 03:52 PM2016-01-29T15:52:40+5:302016-01-29T16:00:27+5:30
रोहित शर्मा (६०) आणि विराट कोहलीच्या (५९) धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. २० षटकात भारताने ३ गड्याच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २९ - रोहित शर्मा (६०) आणि विराट कोहलीच्या (५९) धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. २० षटकात भारताने ३ गड्याच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या आहेत.
शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला. रोहित शर्मा (६०) आणि शिखर धवन (४२) यांच्या धडाकेबाज फलंदाजी करत पहिल्या १३ षटकात ११० धावांची सलामी दिली. जॉन हेस्टिंग, जेम्स फॉकनर यांना धवन-रोहितच्या आक्रमतेचा फटका बसला. फॉकनरच्या पहिल्या दोन षटकांतच भारतीय सलामीवीरांनी २७ धावा चोपल्या.
रोहित शर्माने धडाकेबाज अर्धशतक केले तर धवन ४२ धावावर बाद झाला. रोहित शर्मा धावबाद झाल्यानंतर विराट कोहलीने सामन्याची सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली, कोहलीने ७ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ३३ चेंडूत ५९ धावा केल्या. कोहलीने कर्णधार धोणीच्या साथीने संघाला १८४ धावापर्यंत नेहले. धोणीने आज फलंदाजीस लवकर येत सर्वानाच धक्का दिला. धोणीने ९ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने १४ धावांचे योगदान दिले. सुरेश रैना एकही चेंडू न खेळता नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियातर्फे ग्लेन मॅक्सवेल आणि अँड्रयू टाय यांनी प्रत्येकी एका फंलदाजाला बाद केले.
मालिका वाचविण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या दुस-या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या टी २० सामन्यात भारतीय संघात कोणताही बदल केला नाही. तर ऑस्ट्रेलिया संघात ३ बदल करण्यात आले आहेत. पहिला सामना ३७ धावांनी जिंकून भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकल्यास सिडनीत अखेरच्या टी-२० त प्रयोग करण्याची भारताला संधी असेल
उभय संघ
भारत -
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, युवराजसिंग, महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. आश्विन, आशिष नेहरा, जसप्रित बुमराह.
ऑस्ट्रेलिय
ऍरॉन फिंच (कर्णधार), शॉन मार्श, ख्रिस लिन, ग्लेन मॅक्सवेल, शेन वॉटसन, मॅथ्यू वेड, जेम्स फॉकनर, जॉन हेस्टिंग्ज, स्कॉट बोलॅंड, अँड्रयू टाय, नॅथन लिऑन